chandrakant patil news esakal
महाराष्ट्र बातम्या

'हो मी भावूक झालो, सरकार नसल्यामुळे जे सहन कराव लागलं... : चंद्रकांत पाटील

हो मी भावूक झालो

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : या जिल्ह्यामध्ये राजकीय चढ-उतार नेहमी होत राहिल आहेत. ते चढ-उतार एक नैसर्गिक बाब आहे. ती मनुष्याच्या आणि समाजाच्या आयुष्यात येतात. पण एकोणिसच्या बदलानंतर असा काही मद, मस्ती, अहंकार काही व्यक्तींच्या डोक्यात चढला. तो उतरवण्यासाठी काही तरी संतुलित होण्याची आवश्यकता होती, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीवर केला. आज कोल्हापूरमध्ये (Kolhapur) खासदार धनंजय महाडिक यांची विजय मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Chandrakant Patil Says, We Suffered Most In Two And Half Years)

आता केवळ एक खासदार झाला नाही. धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) या महाडिक घराण्यामागे एक प्रचंड मोठी ताकद आहे. ज्या ताकदीला राजकीय जोडची आवश्यकता होती, ती मिळाली आहे. ६३ वर्ष मला झाली. या ६३ वर्षांमध्ये सगळी वर्षे नाही. पण गेली २० वर्ष वाढदिवस मी साजरा करतो, की ज्यात लोकोपयोगी कामे करतो. पहिला वाढदिवस असा झाला की त्या दिवशी मिळालेली गिफ्ट माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. हो मी भावूक झालो होतो. त्याचे कारण गेल्या अडीच वर्षांपासून सरकार नसल्यामुळे जे सहन कराव लागलं त्या सर्व सहन करण्यातून एक मनामध्ये भाव निर्माण झाला, या सर्वाचा परिमार्जन झालं आणि मला यातून आनंदाश्रू आवरता आले नसल्याचे पाटील म्हणाले.

मी धनंजय महाडिकांना म्हटलं, आणि देवेंद्र फडणवीसांना तर मी म्हणण्याची आवश्यकता नाही. त्यांनी आम्हाला म्हटलं, की उतू नको मातू नको घेतला वसा सोडू नको. आणि म्हणून आमची अहंकाराची भाषा नाही. धनंजय महाडिक भारतीय जनता पक्षाचे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या पाऊलवाटेवर विकासाच्या हमरस्त्यावर चालतील. आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करुन देतील. नजीकच्या काळात नगरपरिषद, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आहेत. सगळ्या निवडणुकांमध्ये या यशाचे प्रतिबिंब आपल्याला दिसेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT