Chandrakant Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

OBC आरक्षण : निवडणुकांना सरसकट स्थगिती द्या, पाटलांचे आयोगाला पत्र

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation In Local Bodies) स्थगिती दिली आहे. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. सरकारला ओबीसी आरक्षण उमजत नाही. हे सरकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे आहे. आता निवडणुकांना सरसकट स्थगिती देण्याची मागणी करणारे पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ओबीसीला ५ वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून बाहेर ठेवायचं आहे. त्यामुळे सरकारने ओबीसी आरक्षणाबाबात या सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी इम्पिरिकल डेटाबाबत खुली चर्चा करावी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर देखील चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्मचाऱ्यांची मूळ मागणी सरकारमध्ये विलनीकरण करण्याची आहे. सरकारी कर्मचाऱ्यांइतका पगार देऊ, असं अनिल परब देखील म्हणाले. तसेच समिती नेमली आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हटले आहे.

ओबीसी आरक्षणावरून त्यांनी हरी नरके यांच्यावर देखील निशाणा साधला. राज्यात इतकी लहान मुलं काम करतात का, की जे फडणवीसांच्या सांगण्यावरून आदेश काढतील. देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून आदेश काढणार असतील तर त्यांचं सर्वच ऐकावं, असंही पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: सकाळ माध्यमाच्या नावे व्हायरल होत असलेली 'सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा' ही पोस्ट खोटी

आई झालेल्या दीपिका पादुकोणची उडवली खिल्ली; मग लिहिली त्याहून वाईट कमेंट, नेटकऱ्यांचा संताप अनावर

WBBL, Video: कडक! स्मृती मानधानाने पळत येत घेतला अफलातून कॅच, Video होतोय व्हायरल

Pune Assembly Election 2024 : खा मटण, दाबा आमचे बटण; मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

Kelara Beach : हिवाळ्यात केरळ फिरायचं प्लॅन करत आहात का ? तर या ५ बीच ला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT