Chandrashekhar Bawankule: महायुतीचा समन्वय करुन आमचं टार्गेट ठरलं असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. आजची बैठक ही महाराष्ट्राला क्रमांक एकवर नेण्याकरिता आहे.
तर तीन नेतृत्वाचा फायदा महाराष्ट्राला होईल असं बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. भाजप नंबर एकचा पक्ष आहे. पुढेही राहील ही आमची भुमिका आहे. मला विश्वास आहे. विकासात्मक बाबी सोबत घेऊन प्रचंड ताकदीने भाजप काम करेल असा आत्मविश्वास देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. (Marathi Tajya Batmya)
अजित पवार गट, शिवसेना आणि भाजप मिळून आम्ही आमचं टार्गेट पुर्ण करु. आम्ही ज्या जागा जिंकू शकतो त्याच आम्ही लढवणार आहोत. महाराष्ट्रात ४५+ आकडा असणार आहे. तर देशात ३५०+ आकडा होईल. महाराष्ट्रात तो आकडा १५२+ झालेला असेल असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)
तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल. तर आम्ही जे ठरवले आहे, ज्या जागा आम्ही जिंकु शकतो अशाच जागा आमच्याकडे आम्ही मागणार आहोत.
१०६ आमदार आणि १० अपक्ष आमदार आमच्याकडे आहेत. यावेळी सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यावरून यावेळी भाजपचा विजय मोठा असणार आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. (Marathi Tajya Batmya)
देशामध्ये ३५० पेक्षा जास्त , महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल. तर महाराष्ट्रात शिवसेना, अजित पवार गट मिळून १५२पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. आमची युती पक्की आहे, आमचं जागा वाटप पक्क आहे.
कोणतेही विरोधाभास होणार नाहीत. हे सर्व करून १५२ भाजप आणि बाकी इतर ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी असणार आहे असंही बावनकुळे म्हणाले आहेत.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.