महाराष्ट्र बातम्या

'अजितदादा... सांभाळून बोला,आम्ही फाटके आहोत'; पाटलांचा इशारा

नामदेव कुंभार

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेल्या उत्तरानंतर संताप अनावर झालेल्या चंद्रकांत पाटलांनी गर्भित इशाराच दिला. “ज्या भाजपासोबत आपण तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान अजित पवार यांनी बाळगावे. आम्ही फाटकी माणसं आहोत, आम्ही बोलायला लागलो तर महागात पडेल, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी इशारा दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने रविवारी (३० मे) कोल्हापूर येथे करोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला.

ते म्हणाले, महाविकासआघाडी स्वतःचे दोष केंद्रावर ढकलत आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांची खोली कळत नाही. कोरोना काळात आरक्षणासाठी आंदोलन (maratha reservation) करायचं नाही ही भूमिका भाजपला मान्य नाही. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न तोकडे आहेत, असा हल्ला त्यांनी यावेळी केला. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (suprime court) ओबीसी संदर्भात दिलेल्या निर्णयावरून ठाकरे सरकारवर निशाना साधला. अजित पवार यांनी भाजपावर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे, आम्ही फाटके आहोत. आम्ही बोलायला सुरुवात केली तर ते महागात पडेल, असा इशाराही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना दिला.

“ कुणीही तलवारीचा धाक दाखवून अजित पवारांना शपथविधीसाठी नेलेलं नव्हतं. त्यामुळे आपण ज्या भाजपासोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचं भान बाळगायला हवं. तुम्हाला तुमचे 28 आमदार बरोबर आणले ते ठेवता आले नाहीत. सगळे शरद पवारांकडे पळून गेले. त्यानंतर तुम्ही महाविकास आघाडीतही उपमुख्यमंत्री आणि फडणवीसांसोबत स्थापन केलेल्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्रीच. आता माहीत नाही उद्या पुन्हा नवं सरकार स्थापन होईल, त्यातही तुम्हीच उपमुख्यमंत्री असाल. अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती आहे,” अशी टीका पाटील यांनी केली.

अजित पवार काय म्हणाले होते?

ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, अशी नवी गर्जना करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला होता. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत बोलतांना अजित पवार यांनी ते झोपेत असताना बोलले की जागे असताना असा खोचक सवाल करत पाटील यांची खिल्ली उडवली. ज्या दिवसापासून महाविकासआघाडीचे सरकार आले त्या दिवसापासून त्यांना असह्य झाल आहे, त्यांना आपण सरकारमध्ये नाही ही सतत बोचणी लागून राहिली आहे, आपल्या सगळ्यात जास्त जागा येऊन आपण सरकारमध्ये नाही, त्या मानसिकतेतून ते बाहेरच यायला तयार नाहीत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी इकडे तिकडे जाऊ नये, त्या मुळे सतत एक पुडी सोडण्याचे काम पाटील करतात. जोवर सोनिया गांधी, शरद पवार व उध्दव ठाकरे एकत्र आहेत तो वर सरकारला काहीही धोका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

SCROLL FOR NEXT