औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीका केली आहे. राज ठाकरेंचा हा भोंगा सामान्यांना परवडणारा नाही. तो जनतेमध्ये तेढ निर्माण करणारा आहे. त्यातून समाजात तेढ तयार होईल व दंगली होतील. त्यावेळी ते घरातून तमाशा पाहातील, या शब्दांमध्ये भुजबळ यांनी ठाकरेंवर टीका केली. औरंगाबाद (Aurangabad) येथे आज सोमवारी (ता.११) भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या मागे सक्तवसुली संचालनालयाची (ED) चौकशी लागली होती. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. (Chhagan Bhujbal Criticize Raj Thackeray For His Mosque Comment Aurangabad News)
मात्र तेच राज ठाकरे (Raj Thackeray) आता राज्य सरकारच्या विरोधात बोलतात. ईडीच्या कारवायांवर भुजबळ यांनी टीका केली. ईडीचा कायदा मागे घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे, असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांच्या घरावरील हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. लवकरच सत्य बाहेर येईल, असे भुजबळ म्हणाले. शरद पवार हे एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे.
त्यांनी अगोदरपासूनच कर्मचाऱ्यांची बाजू घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी ते ओबीसी आरक्षण, सोमय्या पिता-पुत्रा याविषयावरही बोलले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.