Sharad Pawar Chhagan Bhujbal Meeting Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: आरक्षणप्रश्नी शरद पवार, CM शिंदेंमध्ये होणार चर्चा! भुजबळ-पवार बैठकीत नेमकं काय घडलं?

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसींमध्ये निर्माण झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल दीड तास दोघांमध्ये आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोन दिवसांत आपण मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करु, असं शरद पवारांनी सांगितल्याचं भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. (Chhagan Bhujbal meet Sharad Pawar Silver Oak Maratha Reservation OBC Eknath Shinde)

भुजबळ म्हणाले, प्रतिक्षेनंतर मला शरद पवारांनी भेटण्यासाठी बोलावलं. त्यांनी मला विचारलं कशासाठी आले आहेत. त्यावर मी त्यांना सांगितलं की ओबीसी मराठावरून वाद सुरू आहे. तुम्ही राज्यातील सर्वात जेष्ठ नेते आहात, तुम्ही मुख्यमंत्री असताना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आता वाद मिटवला पाहिजे यासाठी भेट घेतली. आमच्यामध्ये दीड तास चर्चा झाली.

PM मोदी, राहुल गांधींनाही भेटणार

जरांगे सोबत काय चर्चा केली आम्हाला माहिती नाही. हाके, ससाणे, वाघमारे यांचं उपोषण सोडायला गेले त्यावेळी काय चर्चा झाली मला माहीत नाही. मी त्यांना विनंती केली की, तुम्हाला राज्याचा चांगला अभ्यास आहे. आम्हाला सगळा अभ्यास आहे असं नाही. मी या विषयाबाबत कोणालाही भेटायला तयार आहे, गोर-गरिबांची घरे पेटता काम नये. यावर मी कोणालाही भेटायला तयार आहे. मग पंतप्रधान असो की राहुल गांधी असोत. आमच्यामध्ये धनगर आरक्षणावर विषयी चर्चा झाली. सर्व समाजाच्या आरक्षणावर पवारांशी चर्चा झाली.

शरद पवारांनी दिलं आश्वास

दरम्यान, शरद पवारांनी आश्वासन दिलं की, पवार म्हणाले मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बोलतो आणि त्यानंतर हा विषय कसा सोडवायचं मार्ग काढतो. ओबीसी विषय हा आमचा विषय आहे, चार-पाच लोकांना बोलवतो आणि चर्चा करतो, राज्य शांत राहिल पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं, असं छनग भुजबळ यांनी सांगितलं.

प्रफुल्ल पटेलांना सांगून गेलो

सभागृहात मी जे काही बोललो किंवा मला मंत्रिपद आणि कशाची पर्वा नाही. मी निघताना प्रफुल पटेल यांच्यासोबत बोलणं करुन निघालो होतो. उपमुखमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले किंवा विजय वड्डेटीवार, उद्धव ठाकरे अशा सगळ्यांना बोलावून ही बैठक होऊ शकते, असंही यावेळी भुजबळ यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT