Chhagan Bhujbal on Sharad Pawar:राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार सत्तेत सामील झाल्यावर शरद पवार यांनी महाराष्ट्रात पक्षबांधणीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेतली होती. त्यानंतर अजित पवार गटातील नेते आणि शरद पवार गटातील नेत्यानंतर द्वंद्व सुरु झाले.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेऊन बंडखोर नेत्यांवर टीका केली होती. छगन भुजबळ यांनी रविवारी (दि.२७ ऑगस्ट) बीडमध्ये अजित पवारांनी घेतलेल्या सभेत शरद पवारांवर पलटवार केला. अनेकवर्ष शरद पवारांसोबत असलेल्या छगन भुजबळांनी या सभेत शरद पवारांनी केलेल्या चुकांचा पाढा वाचून दाखवला.
यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. छगन भुजबळ यांंनी या सभेत पहाटेच्या शपतविधीबद्दलही भाष्य केले. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, "दादांनी सकाळी शपथविधी घेतला, तर म्हणे गुगली होती … राजकारणात अशा गुगली असते का ? गुगलीत स्वत:च्या प्लेअरला आऊट करायचं असतं का?"
शरद पवारांनी जेव्हा येवल्यात सभा घेतली होती, तेव्हा त्यांनी येवल्यातील जनतेची माफी मागितली होती. यावर भुजबळ म्हणाले की, "साहेब म्हणतात… माझी चूक झाली, माफी मागतो. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागाची असेल तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल."(Latest Marathi news)
"जेव्हा काँग्रेसमधून तुम्हाला बाहेर काढण्यात आलं तेव्हा छगन भुजबळ पहिला माणूस होता, जो तुमच्यासोबत होता. अनेकांनी फोन करुन सांगितलं की शरद पवारांसोबत जाऊ नका, तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो."
बीडमध्ये झालेल्या या सभेत छगन भुजबळ यांनी ईडीच्याही मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले की,"आमच्यावर ईडीची कारवाई झाली, आम्ही आत गेलो आणि बाहेर येऊन पुन्हा तुमच्यासोबत पुन्हा उभे राहिलो. आम्ही ईडीला घाबरत नाही." यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर अनेक आरोपही केले. आता छगन भुजबळांच्या या वक्तव्यांवर शरद पवार काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. (Latest Marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.