Chhagan Bhujbal reply to sharad pawar yeola sabha Ajit Pawar NCP Crisis maharashtra Politics  
महाराष्ट्र बातम्या

Bhujbal On Sharad Pawar : तुम्ही ज्यांना सांभाळलं ते अजित पवार तर…; छगन भुजबळांचा पुन्हा पवारांवर घाव

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर शरद पवार गट विरूद्ध अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. यादरम्यान शरद पवारांनी पक्षउभारणीसाठी राज्याचा दौरा सुरू केला आहे. याच पार्श्वभूमिवर शरद पवरांनी छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ला असलेल्या येवला येथे सभा घेतली.

शरद पवारांनी काल झालेल्या सभेत छगन भुजबळ यांच्यावर टिका केली. याला आज भुजबळांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडाबाबत बोलताना हे का झालं याचा विचार करण्याा सल्ला भुजबळांनी पवारांना दिला आहे.

भुजबळ म्हणाले की, "हे झालं कुठून? साहेब तुमच्या घरातून झालं ना? आता ६१-६२ वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं ते अजित पवार तर मुख्य आहेत. ते तर उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, ते बघा ना का आहेत ते. ही इतकी मंडळी का गेली याचा विचार करा. दिलीप वळसे, दिल्लात अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत मंत्री, खासदार असलेले प्रफुल्ल पटेल का जातात? याआधी सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी पवार साहेब प्रफुल्ल पटेलांनांच पाठवत होते. ते का सोडून गेले याचा विचार करायला पाहिजे." शरद पवारांना वाटतं की, छगन भुजबळांनी हे घडवून आणलं ही चुकीची कल्पना आहे, असेही भुजबळ म्हणाले.

२०१४ साली भाजपने निवडणुकीच्या वेळेला शिवसेनेला सोडलं तेव्हा पवार म्हणाले होते की तुम्ही शिवसेनेला सोडलं की आम्ही काँग्रेसला सोडू आणि निवडणुकीनंतर काही महिन्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमध्ये प्रवेश होईल.तुम्ही पाहिलं की काँग्रेसपासून देखील आम्ही दूर झालो आणि शिवसेनाला भाजपासून दूर केलं आणि आम्ही स्वतंत्र्य लढलो. त्यानंतर कमी संख्या असल्याने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. तेव्हा अचानक पाठिंबा कायम धरू नका असे सांगितलं. पण या चर्चेत मी नव्हतो. यामध्ये प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि शरद पवार हेच चर्चा करत होते, असेही छगन भुजबळ म्हणाले.

भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

शरद पवार यांच्या येवला येथील कालच्या सभेचं नियोजन ज्यांनी केलं होतं ते माणिकराव शिंदे यांची शिस्तभंग केल्यावरून पक्षाने जानेवारी २०२० साली हकालपट्टी केली आहे. दोन महिने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली होती. काढलं त्यांचं पक्षासाठी काही योगदान नाही. येवल्यासाठी देखील काहीच योगदान नाही. पण दुसरे कोणी भेटले नाहीत तर त्यामुळे त्यांचं सहकार्य घेतलं असा असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Blast Threat: पुणे विमानतळावरील 11 विमाने उडवण्याची धमकी; शहरात खळबळ

Jio Hotstar Domain: ॲप डेव्हलपरने JioHotstar चे विकत घेतले डोमेन; आता रिलायन्सला पत्र लिहून केली मोठी मागणी

Manu Bhaker: दोन ऑलिंपिक मेडल जिंकून मनू निघाली कॉलेजला ! सोशल मीडियावर पोस्ट टाकून म्हणते, बॅलन्स साधणे महत्त्वाचे..

Latest Maharashtra News Updates live : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी अर्ज दाखल केला

Sawantwadi Politics : सावंतवाडीत बहुरंगी लढती? ..तर दीपक केसरकरांना असणार तेलींचं कडवं आव्हान?

SCROLL FOR NEXT