Chhagan Bhujbal said that Devendra Fadnavis was invited to the Marathi Sahitya Sammelan 
महाराष्ट्र बातम्या

राजकीय नाराजी नाट्यावर पडदा; साहित्य संमेलनाचे फडणवीसांना निमंत्रण

विक्रांत मते

नाशिक : येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) तोंडावर आले असताना भाजप नेत्यांना डावलले जात असल्याचा आरोपानंतर नवा राजकीय वाद उफाळून आला होता. दरम्यान साहित्य उत्सवात सहभागी करून घेताना भाजप नेत्यांना डावलल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त करणाऱ्या महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांच्याशी थेट संपर्क साधून संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

त्यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते देखील संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (ता. ४) सहभागी होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगीतले.दरम्यान महापौर कुलकर्णी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून संमेलनात सहभागी होण्याबाबत विचार करणार असल्याचे सांगितले.

नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भाजप नेत्यांबरोबरच खासदार, आमदारांची नावे निमंत्रण पत्रिकेतून वगळल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी संमेलनात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यापार्श्वभूमीवर संमेलनाचे स्वागताध्यक्ष व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असून महापौर सतीश कुलकर्णी साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे सांगितले. फडणवीस व महापौर कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनास नाशिक महानगरपालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात असून निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाशिकचे साहित्य संमेलन हे आपणा सर्वांचे साहित्य संमेलन असून सर्वांच्या सहभागाशिवाय हे यशस्वी होणार नाही. त्यामुळे नाशिककर म्हणून संमेलन यशस्वी करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तसेच महापौर म्हणून संमेलनासाठी येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचे स्वागत करावे लागणार आहे. त्यामुळे आपण या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना केले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असल्याचे भुजबळांना सांगितले.

नाशिकचे साहित्य संमेलन सर्वांचेच असल्याने यशस्वीतेची जबाबदारी देखील सर्वांचीच आहे. त्यामुळे पाहुण्यांचे स्वागत महापौर या नात्याने करावे लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी संमेलनास हजर राहणार आहे.- छगन भुजबळ, स्वागताध्यक्ष.

संमेलनाचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी माझ्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. संमेलनात भाजप नेत्यांना डावलल्याची तक्रार त्यांच्याकडे केली. संमेलनाला हजर राहायचे कि नाही याबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ठरवू.- सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT