eknath shinde deepak kesarkar sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai News : पुतळा कोसळण्याच्या घटनांवरून केलेल्या वक्तव्यावरून दीपक केसरकर आले अडचणीत; मुख्यमंत्र्यांनी फटकारले

बदलापूर आंदोलन आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनांवरून केलेल्या वक्तव्यावरून शिक्षणमंत्री दीपक केसरकर आले अडचणीत.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - बदलापूर आंदोलन आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनांवरून केलेल्या वक्तव्यावरून शिक्षणमंत्री दीपक केसरकर अडचणीत आले आहेत. बदलापूर येथील घटनेवरून शिक्षणमंत्री या नात्याने शाळेच्या व्यवस्थेविषयी केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांना रविवारी (ता.२५) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चांगलेच फटकारले.

बदलापूरच्या घटनेवरून केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चांगलीच हजेरी घेतल्याचे कळते. या शाळेत तक्रार पेटी नाही, महिला कर्मचारी नाहीत, आदी वक्तव्ये केसरकर यांनी केली होती.

त्यामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी केसरकर यांना यावरून झापले. शिक्षणमंत्री असताना आपण अशा प्रकारची वक्तव्ये करता, प्रत्यक्षात कार्यवाही का केली नाही, अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर वाईटातून चांगले घडते, असे वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी केसरकर यांच्यावर टीकेचा भडिमार केला. आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भात आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

वाईटातून चांगले होईल, याचा अर्थ याठिकाणी यापेक्षाही मोठा शंभर फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार असून या बैठकीत याविषयी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

..तर नौदलाबद्दल आदर नाही

राजकोटच्या घटनेचे पण समर्थन करत नसल्याचे सांगून ‘‘हा पुतळा उभारण्याची संपूर्ण जबाबदारी नौदलाने घेतली होती. मात्र त्यानंतरही जर कोणी नौदलाला दोष देणार असेल, तर याचा अर्थ तुम्हाला नौदलाबद्दल आदर नाही,’’ असे विचित्र उत्तर केसरकर यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT