राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी एका प्रचारसभेत बोलताना मतदारांना प्रलोभन दाखवणारे वक्तव्य केले होते, त्या वक्तव्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे, त्याचबरोबर यासंबधी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (The Election Commission ordered an inquiry)
काय लागेल को निधी द्यायला सहकार्य करू, पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीनमध्ये बटण दाबा कचाकचा, म्हणजे मलाही बरे वाटेल. नाही तर माझा हात आखडता होईल, असं वक्तव्य अजित पवार यांनी इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करत गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर विरोधकांनी देखील याबाबत तक्रार दिली होती, त्यानंतर राज्या निवडणूक आयोगाने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अजित पवारांच्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहेत.
आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, हा ध चा मा करण्याचा प्रकार आहे. मी गमतीने ते वक्तव्य केलं होतं, मी नेहमी विचारपुर्वक बोलतो आणि आचारसंहितेची खबरदारी घेतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.