Chief Justice DY Chandrachud  
महाराष्ट्र बातम्या

"सरन्यायाधीशांना एवढं संतापलेलं बघितलं नाही"; आता राहुल नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागेल, नाहीतर...

Sandip Kapde

Shiv Sena MLA disqualification case: शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल देण्यात विलंब होत असल्यामुळे ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले.

विधानसभा अध्यक्षांचे वेळापत्रक सुप्रीम कोर्टाने फेटाळले. कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करु नका, असं कुणीतरी विधानसभा अध्यक्षांना सांगा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.  कोर्टाने नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर देखील नाराजी व्यक्त केली. तसेच मंगळवारपर्यंत सुधारित वेळापत्रक द्या, नाहीतर आदेश देऊ, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

यावेळी कोर्टात काय झालं हे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले. ते एबीपी माझासोबत बोलत होते. कोर्टाने सांगितलं आम्हाला मंगळवारी नवीन वेळापत्रक द्या. हा पोरखेड सुरु असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत, असे सरन्यायाधीशांनी म्हटल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना समजत नसेल तर त्यांनी तुषार मेहता आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता यांनी अध्यक्षांबरोबर बसावं व त्यांना समजावून सांगा की सुप्रीम कोर्ट काय आहे. आमचे आदेश पाळले गेले पाहिजे, असे कोर्टाने कडक शब्दात राहुल नार्वेकर यांना सांगितल्याचे सिद्धार्थ शिंदे म्हणाले.

मंगळवारी वेळापत्रक बरोबर दिले नाही तर आम्हाला तुमच्यावर २ महिन्यांचा कालावधी लादावा लागेल, असं कोर्टाने अध्यक्षांना स्पष्ट सांगितलं. तुषार मेहता आणि कपिल सिब्बल यांच्यामध्ये कोर्टात थोडी चीडचीड देखील झाली. यावेळी न्यायाधीशांनी त्यांना सोबत कॉपी प्यायला सांगितले. पण अध्यक्षांनी आज खूपच कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. एवढा राग आलेले सरन्यायाधीश मी यापूर्वी बघितले नाहीत. तुम्ही लवकर निर्णय घ्या, तुम्ही निवडणुकीसाठी थांबले का असेही सरन्यायाधीश म्हणाल्याचे सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले (Latest Marathi News)

सरन्यायाधीश यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही प्रकरणी वेळापत्र देण्यास विधानसभा अध्यक्षांना सांगितले आहे. अजित पवार गटाकडून प्रयत्न होता की हे प्रकरण लांबवावं पण कोर्टाने त्यांना विचारल की तुम्ही देखीळ शरद पवार गटावर अत्रातेची कारवाई केली, तुम्हाला का वाटतं प्रकरण लांबवावं. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT