CM Eknath Shinde News: राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. (Chief Minister called an urgent meeting regarding Maratha reservation)
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सह्यांद्री अतिथी गृहावर दुपारी १ वाजता ही बैठक पार पडेल. या बैठकीला मंत्री उदय सांमत, शंभूराज देसाईंसह इतर मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीनं मुंबईत हजर राहा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच सर्व मंत्री आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत.
मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी राज्य सरकारकडून एक पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचं भवितव्य आता अधांतरी असल्याचं दिसून येतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.