महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसुन येत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी दावा केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील हाच दावा केला. (Latest Marathi News)
मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील 4 मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, असं संजय राऊतांनी म्हंटलं होतं. त्यानंतर याबाबतच्या चर्चांना उधाण आलं. शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रीया देताना या चर्चांचं खंडन केलं आहे. तर शिवसेनेत सध्या हालचालींना वेग आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिंदे गटाच्या सर्वच आमदार, खासदार आणि नेत्यांची काल रात्री महत्त्वाची बैठक बोलावली. वरळीतील एनएससीआय सभागृहामध्ये ही बैठक बोलावण्यात आली होती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती.(Latest Marathi News)
तर शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी या बैठकीबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हंटलं कि, “पक्षाची संघटनात्मक बैठक आहे. बाकीचा काही विषय नाही. आमचा 19 जूनला वर्धापन दिन आहे. त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होईल. हा कार्यक्रम कशापद्धतीने साजरा होणार हे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे”.
म्हस्के यांना 5 मंत्र्यांना डच्चू मिळणार या चर्चांबाबत प्रश्न विचारला असता त्यावर “मंत्री बदल वगैरे असा कोणताही विषय अजिबात नाही. ही मीडियामध्ये पसरलेली बातमी आहे”, असं नरेश म्हस्के यांनी म्हंटलं. तसेच “थोड्याच दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”, अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली आहे.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.