Eknath Shinde Video  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde Video : मुख्यमंत्र्यांचा दुचाकीवरुन प्रवास; शेतात काम अन् भरवला जनता दरबार

संतोष कानडे

साताराः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांपासून मूळ गावी गेलेले आहेत. तिथे त्यांनी शेतीत काम केलं, जनता दरबार भरवला आणि थेट दुचाकीवरुन रपेट मारली.

सातारा जिल्ह्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गाव आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून ते दोन ते तीन वेळेस गावी गेलेले आहेत.

मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री गावी गेलेले आहेत. त्यांनी एका दुचाकीवरुन गावात फेरफटका मारला. शिवाय शेतीमध्ये जावून पिकांची पाहाणी केली आणि कामंही केलं.

मुख्यमंत्र्यांनी गावातील आणि परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार भरवला. कोयना धरणातील गाळ काढण्याचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्र्यांनी केला.

दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेऊन कामाचा झपाटा सुरुच ठेवला आहे. परिसराच्या गावातील लोक मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गर्दी करत आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आलेल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांवर सणसणीत टीका केली होती. त्या टीकेला भाजप आणि शिंदे गटाकडून जशासतसं उत्तर देण्यात आलं. आता मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळ गावी साताऱ्यातील दरे इथं आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : घड्याळाची टिकटिक कायम! अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; पक्षचिन्हाची दिली परवानगी पण...

IND vs NZ 2nd Test : What a Ball... रोहित शर्मा गांगरला, टीम साऊदीनं स्टम्प उडवला; तरीही दिवस भारताच्या नावावर राहिला

Latest Maharashtra News Updates live : महायुतीतील घटकपक्ष जागांची आदलाबदल करणार

Nashik Vidhan Sabha Election: भुजबळांचं ठरलं, पण दिवसागणिक तिढा वाढतोय! कुणाल दराडे अन्‌ शाहू शिंदे यांच्या नावाची चर्चा

Gondia Assembly Election 2024 : अखेर भाजपने डाव साधला,राष्ट्रवादीकडून लढणार राजकुमार बडोले; उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT