State Transport Department sakal
महाराष्ट्र बातम्या

Department of Transport : मुख्यमंत्र्यांच्या परिवहन विभागात बदली पात्र यादीचा घोळ संपेना; अधिकाऱ्यांची मॅट मध्ये धाव

राज्य परिवहन विभागात ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या १६६ मोटार वाहन निरिक्षक तर ३२५ सहाय्यकांच्या बदली पात्र यादीचा घोळ कायम आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्य परिवहन विभागात ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या १६६ मोटार वाहन निरिक्षक तर ३२५ सहाय्यकांच्या बदली पात्र यादीचा घोळ कायम आहे. राज्यभरातील अधिकाऱ्यांनी यावर आपल्या हरकती नोंदवल्या असून, त्यावर परिवहन आयुक्त कार्यालयाने दखलच घेतली नसल्याने अखेर अधिकाऱ्यांनी मॅट मध्ये धाव घेतली आहे. त्यामूळे खुद्द मुख्यमंत्र्यांकडेच असलेल्या या परिवहन विभागाचा कारभार संपता संपत नसल्याचे दिसते आहे.

बदली पात्र असलेल्या मोटार वाहन निरीक्षकानी एकमेकांच्या बदली पात्र क्रमांकावर आक्षेप नोंदवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उत्तीर्ण उमेदवारांची य़ादी घोषीत झाल्यानंतर प्रत्यक्षात विभागात रुजू होण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळा कालावधी लागला आहे. त्यामूळे विभागीय नियुक्तीच्या घेण्यात आलेल्या नोंदी चुकीच्या आहे.

त्यामूळे महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमांतर्गत जेष्ठता यादीत मानीव रुजू दिनांक एकाच परिक्षेत उत्तीर्ण होऊन सर्वात आधी रुजू झालेल्या उमेदवारांचा रुजू दिनांक ग्राह्य धरण्याची मागणी अधिकार्यांनी केली आहे. शिवाय मॅट ने बदली पात्र यादीमधील आदिवासी भागांत कर्तव्य बजावणार्या अधिकाराच्या नावांपुढे तशा प्रकारची नोंद घेवून यादी नव्याने प्रसारीत करण्याचे आदेश केले असून, त्यानंतरच बदली आदेश काढण्याचे मॅट ने आदेश परिवहन विभागाला दिले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बढती-बदली पात्र सेवा जेष्ठता यादीचा घोळ परिवहन विभागात कायम आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही असा ठोस तोडगा काढू न शकल्याने अद्यापही परिवहन अधिकाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय अधिकाऱ्यांचे बदली पात्र यादीतील अनुक्रमांक परिवहन आयुक्त कार्यालयातूनच बदलवण्यात आल्याचा आरोप अधिकाऱ्यांकडून सकाळ शी बोलतांना नाव न लिहीण्याच्या अटिवर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT