कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांच्या प्रचाराची पुण्यात रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उतरले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 22) वाकडमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांनी जाहीर सभादेखील घेतली. दरम्यान, त्याच्या सभेवेळी स्टेज वर लावलेल्या पोस्टरवरुन सोशल वॉर सुरु असल्याचे पाहायला मिळाले.
चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी (दि. 22) पुण्यात होते. यावेळी त्यांनी चिंचवड मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या सभेसाठी भव्य स्टेज उभारण्यात आला होता. स्टेजच्या मागे भले मोठे पोस्टरही झळकवण्यात आले होते.
दरम्यान, अयोध्या सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्षा अयोध्या पोळ पाटील यांनी पोस्टसंदर्भात ट्विट करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या जाहीर सभेच्या स्टेजवरील पोस्टर शेअर केले आहे.
'वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाने राजकारण करत असलेल्या #गद्दार गॅंगला आदरणीय बाळासाहेबांचा फोटो भेटला नाही का बॅनरवर टाकायला?' असा सवाल उपस्थित केला आहे.
तसेच, बॅनरवर फोटो शोधून दाखवा अन अयोध्या पौळ पाटील कडून 5 लाख रुपये बक्षीस म्हणून घेऊन जा. असही त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
मात्र, पोळ यांनी हे पोस्टर कट करुन सोशल मीडियावर चुकीचा संदेश पसरवत असल्याचे लक्षात आलं. दुसऱ्या एका युजरने पोळ यांचे ट्विट रिट्विट करत पलटवार केला आहे.
श्रद्धा एकनाथ बांगर या ट्विटर युजरने जाहीर सभेच्या स्टेजवरील संपूर्ण पोस्टर शेअर केले आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो दिसत आहे. हे ट्विट करताना बांगर यांनी, ' ५ लाख द्यायची तुझी लायकी नसेलच बेवडे , तू किती निर्बुद्ध आहेस हे दाखवून दिलस..अशी कॅप्शन देत आता फक्त चूक मान्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी माग. अशी मागणी केली आहे.
दोन्ही युजरचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत या निवडणुकीत दिसून येत आहे.
26 फेब्रुवारीला दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीचे मतदान होणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी केली जात असून 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. खरंतर ही निवडणूक सुरुवातीपासूनच भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.