chitra wagh uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

अर्थसंकल्पावर चित्रा वाघ नाराज: म्हणाल्या हा तर पुरुषप्रधान...

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलींसाठी विशेष तरतूद हवी होती -चित्रा वाघ

सकाळ डिजिटल टीम

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या अर्थसंकल्पाचा निषेध केला. आज भाजपच्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. हा तर पुरुषी मानसिकतेतील पुरुषप्रधान अर्थसंकल्प असा टोला चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी लगावला आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा पुरुषी मानसिकतेतील पुरुषप्रधान असा आहे. महाराष्ट्राची सध्याची लोकसंख्या १२ कोटी ५० लाख आहे. यामध्ये महिला ६ कोटी १ लाख आहेत. महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून असतात तर प्रोजेक्शन का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलींसाठी विशेष तरतूद हवी होती असेही त्या म्हणाल्या.

अर्थसंकल्पाविषयी नाराजी दर्शवताना चित्रा वाघ म्हणाल्या, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा खरा कणा या महिला आहेत.

अर्थसंकल्पाविषयी नाराजी दर्शवताना चित्रा वाघ म्हणाल्या, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा खरा कणा या महिला आहेत. किमान त्यांच्यासाठी विशेष तरतूद करणे अपेक्षित होते. शेतकरी महिला, बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती प्रोत्साहनासाठी काहीही तरतूद केली नाही. लघु उद्योगातील महिलांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम या सरकारने केले आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

आशा सेविकांविषयी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, आशांना कोविड काळात दिवसाला ३५ रू देण्याचे शासनाने आश्वासन दिले होते. मात्र त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. थोडी जरी कळवळ असेल तर तात्काळ राज्यभरातील आशांचे पैसे देऊन टाका असेही त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT