chitra vagh esakal
महाराष्ट्र बातम्या

"राऊतांची कोल्हेकुई, नवाब मलिक दाऊद का भाई"

मुश्रीफांना टेंडरची मलाई, नवाब मलिक दाऊद का 'भाई' - चित्रा वाघ

सकाळ डिजिटल टीम

मुश्रीफांना टेंडरची मलाई, नवाब मलिक दाऊद का 'भाई' - चित्रा वाघ

राज्यातील महाआघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या निमित्तानं विरोधकांकडून तिखट प्रतिक्रीया उमटत आहेत. भाजपाचे नेते पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकराने केलेल्या कामांबाबत टीका करत आहेत. दरम्यान आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. 2 नंबरी सरकारची 2 वर्ष... आघाडी सरकारची ही काळी कमाई! असा काव्यात्मक शब्दांनी गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दोन वर्षात आघाडी सरकारमधील नेत्यांनी केलेल्या घोटाळ्यांवर त्यांनी सडकून टीका केली आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटमधून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्या म्हणतात, 2 नंबरी सरकारची 2 वर्ष, वसूलीची घाई परबांची मुजोरशाही, मुश्रीफांना टेंडरची मलाई, नवाब मलिक दाऊद का ‘भाई’, निलेश लंकेची गुंडाई, महेबूब शेखची झुंडशाही, संजय राठोडांची लफंगाई, राऊतांची नुसती कोल्हेकुई, मुख्यमंत्र्यांची जनतेप्रती बेपर्वाई, 2 नंबरीमहाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई! अशी काव्यात्मक शब्दांची टिपण्णी केली आहे.

दरम्यान या २ वर्षात ठाकरे मंत्रिमंडळातील एकूण 12 मंत्री, नेत्यांवर कारवाई सुरु आहे. महाविकास आघाडी म्हणजे महावसुली सरकार असून हे सरकार आज पर्यंतच्या इतिहासात पाहिले सरकार पाहिले आहे की 24 महिन्यात 24 मोठे घोटाळे केले आहेत. अर्धा डझन मंत्री किंवा नेते जेलमध्ये जाणार आहेत. या नेत्यांनी आणि ठाकरे सरकारनं महाराष्ट्राला (Maharashtra) लुटण्याचे काम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. डिसेंबर महिन्यात शिवसेनेच्या तीन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आता हे तीनजण कोण असणार आहे ? याबद्दलच्या चर्चेला उधाण आलं आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Elections: बुलेटची पैज! नेता जिंकेल की नाही यावर कार्यकर्त्यांनी लावली पैज, ५०० रुपयांचा लिहून घेतला बॉण्ड

AUS vs PAK 2nd ODI : 28 वर्षानंतर पाकिस्तान जिंकला! विराटकडून धुलाई झालेला गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकला

Latest Maharashtra News Updates : काॅंग्रेसने ओबीसी आणि दलितांना एकमेकांपासून दूर ठेवले, पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

TET Exam : परीक्षार्थींचे बायोमेट्रिक, फेस स्कॅन; टीईटी परीक्षेची जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून तयारी

मालिकांसाठी नाही तर 'या' साठी भारतात परतली मृणाल दुसानिस, पती नीरजने सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT