chitra Wagh first reaction on rupali chaakankar women commission notice over tejaswini pandit urfi javed case  
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh Vs Chakankar : अशा रोज ५६ नोटिसा येतात; चाकणकरांवर चित्रा वाघांचा पलटवार

सकाळ डिजिटल टीम

वेगवेगळ्या वेशभूषांसाठी प्रसिध्द असलेली अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पेटला आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. यावर बोलताना रोजच ५६ नोटिसा येतात अशी रोखठोक प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

उर्फीच्या कपड्यांवरू सुरू झालेला वादात सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर या आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रा वाघांना महिला आयोगाने दोन दिवसात उत्तर देण्याची नोटीस पाठवली आहे.

या नोटीसीबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "रोजच ५६ नोटीसा येतात. पण वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की, महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण जीनं करून दिली तिला नोटीस पाठवली. जी नंगानाच करत फीरतेय ती अशीच फिरतेय. हे महाराष्ट्राचं दुर्दैव. चांगलं उत्तर देऊ, काही काळजी करायची गरज नाहीये" अशी प्रतिक्रीया चित्रा वाघ यांनी दिली आहे. त्यामुळे हा वाध आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. त्या 'टीव्ही९ मराठी'शी बोलत होत्या.

उर्फी जावेद हिच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत काल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परीषद घेतली होती. ज्यामध्ये त्यांनी उर्फीवर टीका करताना महिला आयोगाने अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरून तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली. मात्र, उर्फीला जाणीवपूर्वक नोटीस पाठवत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. याआरोपाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे.

चित्रा वाघ यांनी केलेल्या या आरोपांना आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तरादाखल पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहितीही दिली.

काय नोटीस पाठवली?

महिला आयोगाने चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतली असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी दोन खुलासा सादर करावा अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल, असे नोटिसीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT