Chitra Wagh Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh: चित्रा वाघ यांच्यासह राज्यपाल नियुक्त आमदार विधानसभेत भाजपला कसा मिळवून देणार फायदा? वाचा काय आहे गणित...

अक्षता पांढरे

विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर झाली असून, या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. पण त्याधीच राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांची याची राज्यपालांकडे पाठवून 12 पैकी 7 आमदारांची नियुक्ती केली आहे.

महायुती सरकारकडून पाठवलेल्या 7 नावांमध्ये भाजपकडून 3 शिंदेंकडून 2 तर अजित पवारांकडून 2 नावं देण्यात आली. यानंतर विधीमंडळामध्ये उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत या सात आमदारांचा शपथविधी पार पडला. महायुतीत भाजपने आपल्या वाट्याला 3 जागा घेतल्या. पण ही तिन्ही नावं देण्यामागंच नेमकं कारण काय? विधानसभेला याचा फायदा काय होणार हे आपण जाणून घेणार आहोत.

भाजपकडून राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 3 नावं पाठवण्यात आली होती. चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड या तिघांनीही आमदारकीची शपथ घेतली आहे.

चित्रा वाघ

चित्रा वाघ या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. विरोधकांवर आक्रमकपणे टीकास्त्र सोडतात. जे मंत्री आणि संविधानिक पदावर राहून बोलता येत नाही ते चित्रा वाघ ठामपणे बोलताना पहायला मिळातात. पक्षाची बाजू त्यांनी ठामपणे मांडलेली पहायला मिळते.

सुप्रिया सुळे, रोहिणी खडसे या बड्या महिला नेत्यांना थेट आव्हान म्हणून चित्रा वाघ यांच्याकडे पाहिलं जातं. गेल्या 5-6 वर्षांपासून पक्षासाठी त्या फ्रंट फुटव येऊन लढल्या आहेत. महिला अत्याचारांविरोधात आवाज उठविणाऱ्या नेत्या अशी ओळख त्यांची आहे. संजय राठोड यांच्याविरोधात चित्रा वाघ यांचा आक्रमक पवित्रा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे.

चित्रा वाघ यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली. पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभाग महिला अध्यक्षा झाल्या आणि तिथून पुढे त्यांना ओळख मिळू लागली. त्यानंतर वाघ यांना आघाडी सरकारच्या काळात महिला आयोगाचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

या काळात राष्ट्रवादीची बाजू आक्रमकपणे मांडत असताना चित्रा वाघ यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सारथं महत्त्वाचं पद असताना 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या भाजपात आल्या.

भाजपमध्ये आल्यावर प्रवक्त्या म्हणून काम करत होत्या. यानंत त्यांच्यावर महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा ही जबाबदारी दिली गेली. पण मोठ पदं असं काही मिळत नव्हत. प्रत्येक निवडणुकीवेळी आमदारकीसाठी चित्रा वाघ यांचे नाव चर्चेत यायचे पण प्रत्यक्षात संधी काही मिळत नव्हती.

काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीला देखील चित्रा वाघ यांचे नावं चर्चेत आलं होतं. पण संधी दिली गेली नाही. यानंतर अखेर राज्यपाल नियुक्ती आमदारकीची माळ चित्रा वाघ यांच्या गळ्यात टाकण्यात आली. चित्रा वाघ यांच्या चेहऱ्यानं भाजपने ३ गोष्टी साध्य केल्या त्या म्हणजे ओबीसी चेहरा, महिला आणि विरोधांवर तुटुन पडणारा आमदार. ज्याचा फायदा अर्थात भाजपला होईल.

विक्रांत पाटील

विक्रांत पाटील हे भाजपचे विद्यामान प्रदेश सरचिटणीस आहे. पक्षात अनेक वर्षांपासून त्यांनी वेगवेगळ्या संघटनात्मक पदांवर काम केलं आहे. भारतीय युवा मोर्चातून त्यांना राजकारणाला सुरुवात केली.

भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी विभागापासून प्रदेश सरचिटणीसपर्यंतचा टप्पा त्यांनी पार केला आहे. विक्रांत पाटील पनवेलचे नगरसेवर ते उपमहापौर देखील राहिले आहेत. महत्त्वाच म्हणजे विक्रांत पाटील हे पक्षाचे – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खास मर्जीतील असल्याची चर्चा आहे. विक्रांत पाटील यांच्या चेहऱ्यानं महापालिकेच्या निवडणुकीत फायदा होईल.

धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या विदर्भातील पोहरादेवीच्या गुरुगादीचे ते पीठाधीश आहेत. बंजारा समाजात त्यांचे मानाचे स्थान आहे. आणि काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींचे बंजारा प्रेम सगळ्यांनी पाहिले. त्यामुळे बंजारा समाजाचा विधानसभेला फायदा करून घेणं हा देखील महत्वाचा फॅक्टर बाबूसिंग महाराजांना आमदारकी देण्यामागे आहेत.

महत्त्वाच म्हणजे काही दिवसांपूर्वीच अमित शाह हे विदर्भ दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी पक्षाच्या नेत्यांना एकप्रकारे आदेश दिला होता की विधानसभेला विदर्भावर फोकस करायचा. तो मानून मिशन विदर्भ फत्ते करण्यासाठी विदर्भातला महत्त्वाच्या चेहऱ्याला भाजपने संधी दिली. त्यामुळे धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड यांना राज्यपाल नियुक्त आमदार बनवून भाजपने बंजारा मतं आणि विदर्भ यावर पकड मजबूत केली आहे.

आता भाजपला या सगळ्याचा फायदा विधानसभेला कसा होईल हे पाहणं महत्त्वाच ठरेल.

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : पेजरचे स्फोट होतात, मग EVM कसे हॅक होणार नाहीत... निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा झटका! निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाबाबातची मोठी मागणी

Savner Assembly Elections 2024: रामटेक वगळता ग्रामीणमधून ‘लिफाफे' बंद; भाजपाचा नवा पॅटर्न !

By-Elections 2024: 15 राज्यांमधील 48 विधानसभा आणि 2 संसदीय मतदारसंघांसाठी पोटनिवडणुका जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक

खेळाडूला गालावर जाळ काढला! बांगलादेशचे प्रशिक्षक Chandika Hathurusingha ची तडकाफडकी हकालपट्टी

SCROLL FOR NEXT