MLC Chitra Wagh Esakal
महाराष्ट्र बातम्या

MLC Chitra Wagh: चित्रा वाघ यांच्या गळ्यात अखेर आमदारकीची माळ, जाणून घ्या कसा आहे 26 वर्षांचा राजकीय प्रवास

आशुतोष मसगौंडे

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या अवघे काही तास आधी महायुती सरकारने 7 नावांची यादी राज्यपालांकडे पाठवून राज्यपाल नियुक्त आमदारांचा गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मिटवला आहे.

यामध्ये महायुतीने 12 जागा असतानाही 7 जणांनाच संधी दिली आहे. यामध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड यांना संधी मिळाली आहे. तर शिवसेने माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनिषा कायंदे यांना संधी दिली आहे. अजित पवार यांच्यापक्षाकडून पंकज छगन भुजबळ, इद्रिस नाईकवाडी यांची नावे आहेत.

दरम्यान या सर्व नावांमध्ये सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे चित्रा वाघ. कारण गेल्या 5-6 वर्षांपासून भाजपसाठी पुढे येऊन लढणाऱ्या वाघ यांना पक्षाने संधी दिली आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी आमदारकीसाठी चित्रा वाघ यांचे नाव चर्चेत यायचे पण प्रत्यक्षात संधी काही मिळत नव्हती. मात्र आता राज्यपाल नियुक्ती आमदारकीची माळ अखेर चित्रा वाघ यांच्या गळ्यात पडली आहे.

राजकीय कारकिर्दीची सुरुवात

चित्रा वाघ यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली. पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभाग महिला अध्यक्षा झाल्या आणि तिथून पुढे त्यांना ओळख मिळू लागली. त्यानंतर वाघ यांना आघाडी सरकारच्या काळात महिला आयोगाचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

या काळात राष्ट्रवादीची बाजू आक्रमकपणे मांडत असताना चित्रा वाघ यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. त्या 2019 पर्यंत या पदावर होत्या. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजप मध्ये प्रवेश केला होता.

2019 मध्ये भाजपमध्ये आल्यापासून चित्रा वाघ यांनी अत्यंत आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडली आहे. अनेक वेळा त्या विरोधकांवर तुटून पडल्या आहेत. याचबरोबर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणातही वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

अशात गेल्या पाच वर्षांत वाघ यांना भाजप आमदारकी देणार अशा चर्चा कायम असायच्या पण संधी मिळत नव्हती. मात्र, अखेर भाजपने आता राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना विधीमंडळात पाठवले आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

राज्यपाल नियुक्त आमदारामध्ये नाव असल्याचे समजल्यानंतर चित्रा वाघ यांनी यावर आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या, "ही आनंदाची गोष्ट आहे. भाजप, देवेंद्रजी आणि बावनकुळे यांचे आभार. भारतीय जनता पक्ष गुणाचे चीज करण्याचे काम करतो. कार्यकर्त्याला वापरून फेकण्याचे काम भाजप करत नाही. बहिणींवर येणाऱ्या संकटांसाठी देवा भाऊ सक्षम आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार आहे. कारण सरकार जनतेची कामे करत आहे."

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha Election Declared: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर! आचारसंहिता लागू, मतदान आणि निकालाची तारीख काय?

Latest Maharashtra News Updates : राज्याचा स्वाभिमान आणि धर्म बुडवणार हे सरकार - वडेट्टीवार

Jharkhand Vidhan Sabha Election 2024: झारखंडची विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात; असा असेल इलेक्शन कार्यक्रम

सावत्र आईबद्दल पहिल्यांदाच बोलले अमिताभ बच्चन; लग्नाच्या काही वर्षात झालेलं निधन, म्हणाले- त्यांच्या मृत्यूनंतर बाबूजी...

Election Commission Press Conference LIVE : लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT