Chitra Wagh|Raj Nayani Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

आशुतोष मसगौंडे

देशात लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहे. यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही. अशात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या (UBT) जाहीरातीमध्ये काम केलेले अभिनेते राज नयानी यांना पॉर्नस्टार म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

आता राज नयानी यांनी आक्रमकणे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच चित्रा वाघ यांनी त्याची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. जर वाघ यांनी माफी मागितली नाही तर नयानींनी वाघ यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी 2 मे रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये वाघ यांनी शिवसेना (UBT) पक्षावर गंभीर आरोप केले होते.

चित्रा वाघ म्हणाल्या होत्या की, शिवसेनेने (UBT) आपल्या प्रचारासाठी केलेल्या जाहिरातीमध्ये एका पॉर्नस्टार कडून अभिनय करून घेतला आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी काही छायाचित्रेही दाखवली.

उद्धव ठाकरे गटाने नवी संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार केला आहे. प्रचारानिमित्त ठाकरे गटाच्या ज्या जाहिराती येत आहेत. त्यामध्ये अदुबाळ नाईटलाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट कंपनीच्या उबाठाच्या जाहिरातीमध्ये जे पात्र आहे ते पॉर्नस्टारचं आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.

अभिनेत्याचे प्रत्युत्तर

दरम्यान शिवसेनेच्या (UBT) जाहिरातीमध्ये काम केलेले अभिनेते राज नयानी यांनी चित्रा वाघयांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आज समाजमाध्यमावर व्हिडीओ द्वारे त्यांनी भूमिका मांडली.

राज नयानी म्हणाले, “चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी कराण त्यांनी एका चारित्र्यवान कलावंताचा अपमान केला आहे. त्यामुळे वाघ यांनी माझी माफी मागावी नाहीतर मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे."

नयानी पुढे म्हणाले, "चित्रा वाघ सुशिक्षित महिला आहेत. एखादा कलाकार जेव्हा चित्रपट किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला भूमिकेच्या मागणीप्रमाणे अभिनय करावा लागतो."

"चित्रा वाघ यांनी आज एका वेबसिरीजमधील माझ्या भूमेकेचा फोटो दाखवत मी पॉर्नस्टार असल्याचा दावा केला आहे. वाघ यांनी माझ्या अभिनयाला, मला पॉर्नस्टार म्हटले याची मी निंदा करतोय. माझ्यावर केलेल्या या आरोपांबाबत चित्रा वाघ यांनी दोन दिवसांत माफी मागावी. जर त्यांनी माफी नाही मागितली तर मी त्यांना न्यायालयात खेचत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे," असे अभिनेते राज नयानी यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT