Anil Deshmukh sakal media
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुखांना वसुली प्रकरणात CBI कडून क्लीन चिट?

सुरज सावंत

सीबीआयकडून एक महत्त्वाची माहिती समोर आलीये. देशमुख यांचा या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचे सीबीआयच्या चौकशीतून समोर आलंय.

मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख याच्यांवर बदल्यांसंदर्भात गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. त्या संदर्भात सीबीआयकडून एक महत्त्वाची माहिती समोर आलीये. देशमुख यांचा या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचे सीबीआयच्या चौकशीतून समोर आलंय. सीबीआयचा हाच अहवाल 'साम टीव्हीच्या' च्या हाती लागला आहे. या अहवालात अनिल देशमुखांविरोधात सीबीआयच्या चौकशीत ठोस पुरावे मिळाले नसल्याचं समोर आलं आहे. नेमकं या अहवालात काय म्हटलंय ते पाहुयात...

1) मुंबईतल्या पोलिस उपायुक्त पदापर्यंतच्या बदल्या या पोलिस आयुक्तालयातून ठरवल्या जातात. IPS अधिकाऱ्याच्या बदल्या आणि नियुक्त्या या पोलिस आस्थापना मंडळाकडून गृहसचिव यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयात पाठवल्या जातात.

2) पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत निलंबित अधिकारी यांना पून्हा पोलिस खात्यात घेण्याचे अधिकार हे पोलिस आस्थापन मंडळाला असतात. तर ग्रामीण भागातील निलंबित अधिकाऱ्यांना सेवेत घेण्याबाबतचे अधिकार हे महाराष्ट्र पोलिस महासंचालक व गृहसचिव यांना असतात. मुंबई शहरामध्ये पोलिस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्याचे पूनस्थापनेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे पोलिस आयुक्तांना आहेत.

3) सचिन वाझे याला पून्हा सेवेत घेण्याबाबतचा निर्णय हा पोलिस आस्थापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सचिन वाझेच्या पूनस्थापनेनंतर दोनच दिवसात त्याला सीआययूचा इनचार्ज म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. ही पोस्ट वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची असताना, सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर पून्हा नियुक्ती झालेल्या सचिन वाझेला देण्यात आली. ही पोस्ट पोलिस खात्यातील महत्वाची पोस्ट असताना, एका सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावरील अधिकारी सचिन वाझे याची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यावर तत्कालिन सह पोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

4) सचिन वाझेची नियुक्ती केल्यानंतर तो प्रोटोकाँल पाळत नव्हता. तसेच तो त्यांच्या वरिष्ठांना डावलून थेट पोलिस आयुक्तांना रिपोर्ट करत होता. अँन्टिलिया स्फोटक प्रकरण समोर आल्यानंतर गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आले होते की, मुंबईतील अनेक मोठे आणि संवेदनशील गुन्हे हे पोलिस आयुक्त परमबीर सिंह याच्या आदेशानुसार सचिन वाझेला तपासासाठी देत होते. तसेच या संवेदनशील गुन्ह्यांची माहिती तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे मुख्यमंत्री यांना देण्यासाठी जायचे. त्यावेळी ते सोबत सचिन वाझेलाही घेऊन जात होते. यावर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आक्षेपही घेतला होता.

5) ज्या वेळी वाझे हे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत अँन्टिलिया स्फोटक प्रकरण आणि फेक टिआरपी केस मध्ये पत्रकार अर्नब गोस्वामी याच्या अटकेनंतर गुन्हया़ची माहिती देण्यासाठी जायचे, त्यावेळी वाझे आणि अनिल एकमेकांना ओळखत नव्हते. प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया प्रकरणाची माहिती घेण्यासाठी संबधित तपास अधिकाऱ्याला बोलवलेले होते. त्यावेळी वाजे देशमुखा़च्या बंगल्यावर आला होता.

6) माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाजे यांच्यात ज्ञानेश्वरी या बंगल्यावर गुन्ह्याच्या माहिती देण्यासाठी इतर अधिकार्यांसोबत भेटायचे. या व्यतिरिक्त इतर कुठलिही बैठक झाली असल्याबाबतचे पुरावे नाहीत

7) सचिन वाझेची गृहमंत्री अनिल देशमख याच्यासोबत पोलिस आयुक्त परमबीर सिंहसोबत असताना. वर्षा बंगल्यावर फक्त दोनचं वेळा भेट झाली होती. पहिल्यांदा पहिल्यांदा अर्णब गोस्वामी याला अटक केल्यानंतर तर दुसऱ्यांदा ज्यावेळी अँन्टिलिया स्फोटक प्रकरण समोर आले म्हणजेच फेब्रुवारी 2021 च्या शेवटच्या आठवडयात

8) अनिल देशमुखाचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांनी वाझेकडे आँर्केस्ट्रा, बार, पब याच्या मालकाकडून कुठल्याही प्रकारचे पैसे मागितल्याबाबतचे पुरावे आढळूनआलेले नाहीत.

9) ACP संजय पाटील व DCP राजू भुजबळ यांनी देखील त्याच्या जबाबात कुठल्याही प्रकारे कलेक्शन साठीचे आदेश हे गृहमंत्री आणि पालांडे यांनी दिले नव्हते.

10 ) सचिन वाझे केव्हाही एकटा देशमुखाना भेटलाच नाही.

11) सचिन वाझे ज्या वेळी देशमुखांना भेटायला आला त्या वेळी पोलिस आयुक्त परमबीर सि़ह सोबत होते

12) सह पोलिस आयुक्त गुन्हे विभाग यांनी वाझेची बदली सीआयू विभागात केली मात्र त्यांना पोलिस आयुक्त सिंह याचे आदेश होते

13) सीबीआयकडे सचिन वाझेला वेळो वेळी सहकार्य करणे. आदेश देण्याबाबतचे बहुतांश पुरावे सीबीआयकडे आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT