airport solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरच्या विमानसेवेचा मार्ग मोकळा! ‘डीजीसीए’कडून मिळाला परवाना; आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातून उद्‌घाटन

विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी ‘डीजीसीए’कडून करण्यात आली होती. विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने असलेली सर्व मानके सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात आलेली असल्याने ‘डीजीसीए’कडून सोलापूर विमानतळावरून विमान उडणे व उतरण्याचे परवाना (लायसन्स) मंजूर झाला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) ११ व १२ सप्टेंबर रोजी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी व तपासणी करून गेले होते. विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी ‘डीजीसीए’कडून करण्यात आली होती. विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने असलेली सर्व मानके सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात आलेली असल्याने ‘डीजीसीए’कडून सोलापूर विमानतळावरून विमान उडणे व उतरण्याचे परवाना (लायसन्स) मंजूर झाला आहे.

ब्युरो ऑफ सिविल एव्हिजन सिक्युरिटीच्या (नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो) अधिकाऱ्यांनी होटगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली होती. विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी आले होते. त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणीसाठी आली होती. तपासण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘डीजीसीए’कडून सोलापूर विमानतळाला विमान लँड होणे व टेक-ऑफ करण्याची लायसन्स प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. आता सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे आज उद्‌घाटन

सोलापूर विमानतळाचे उद्‌घाटन २६ सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानतळावर नव्याने केलेल्या कामांची पाहणी केली. तसेच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या उद्‌घाटनाच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरण प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा देखील घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी सदाशिव पडदूणे, विमानतळ प्राधिकरणाचे बनोथ चांम्पला आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT