CM Baliraja Mofat Vij Yojana  sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Baliraja Mofat Vij Yojana : शेतकऱ्यांना मिळणार आता मोफत वीज;एप्रिलपासून अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’, ‘ज्येष्ठ नागरीकांना मोफत तीर्थयात्रा’, अशा लोकप्रिय घोषणेनंतर राज्य शासनाने आता शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजना’ लागू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ७.५ एचपी पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना एप्रिलपासून मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील ४४ लाख तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना या योजनेबाबत घोषणा केली होती. त्याचा शासन आदेश काल (ता. २५) सरकारने काढला आहे. जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने ७.५ एचपी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश ऊर्जा विभागाचे उपसचिव कराड यांनी काढला.

ही योजना पाच वर्षांसाठी असून एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. मात्र तीन वर्षांच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. वीज बिल माफ केल्यानंतर वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरणला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक वीज बिल माफीनुसार सहा हजार ९८५ कोटी रुपये आणि सात हजार ७७५ कोटी रुपये सवलतीपोटी असे एकूण मिळून १४ हजार ७६० कोटी महावितरणला द्यावे लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT