cm esakal
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu: बावनकुळे म्हणून 52..., पुढचा मुख्यमंत्री प्रहारचा? बच्चू कडुंनी सांगितला फॉर्मुला

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप होणार

रुपेश नामदास

Chief Minister's Chair: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप होणार असल्याचे दिसून आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे ते चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण एका वेगळ्या दिशेनं चालल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. (Chandrashekhar Bawankule, Bachchu Kadu)

त्यावर आता बावनकुळेंनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. वाबनकुळेंच्या त्या वक्तव्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले असून आता त्यांची जागा देवेंद्र फडणवीस घेणार असल्याबाबत बावनकुळे यांनी वक्तव्य केले आहे.

एवढचं बोलून ते थांबलेले नाहीत तर यापुढील काळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना बसलेलं पाहायचं असेल तर आता आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची वेळ आहे. असंही बावनकुळे म्हणाले होते.

त्यानंतर पुन्हा आज देखील बावनकुळे यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत ५२ आमदार निवडून आणणार तर ११ खासदार निवडून आणणार असं वक्तव्य केलं त्यानंतर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रीया देताना बावनकुळे यांना टोला लागावला आहे.

बच्चु कडू म्हणाले की, "बावनकुळे यांचं आडनाव बावनकुळे असल्यामुळे त्यांनी ५२ हा आकडा सांगितला असेल, आमचे दहा आमदार आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये विदर्भातून निवडून आणू". तर २०२४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानावर बच्चू कडू म्हणाले की," भविष्यवाणी करण्यात काही अर्थ नसतो, जर तरच्या गोष्टींवर विश्वास आम्ही ठेवत नाही, येणारी परिस्थिती कशी असेल त्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात.

पुढील काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील. तर आम्ही असं ही म्हणू शकतो की प्रहारचा देखील मुख्यमंत्री होवू शकतो, पण अशा गोष्टींना काही अर्थ नसतो. असं मत प्रहारचे आमदार यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT