शिंदे समर्थक माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. ठाकरे कुटुंबावर टीका केल्या प्रकरणी वाद वाढला होता. त्यानंतर आता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी मराठा आरक्षणावरूण एक वादग्रस्त विधान केले आहे.
सावंत म्हणाले "फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं पण त्याच ब्राह्मणानं २०१७ मध्ये मराठ्यांची झोळी भरली. मराठ्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि ज्यावेळेस जनतेचा घात करून तुम्ही सत्तेत आलात तेव्हा सहाच महिन्यात आरक्षण गेलं आणि आत्ता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. पण आम्ही आरक्षण देणार, तेही टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. या नंतर राज्याचं वातावरण पेटलं आहे. या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
तानाजी सावंत यांच्या या वादग्रस्त विधानवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करत सांवतांसह शिंदे गटा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. वरपे ट्विट मध्ये म्हणाले आहेत की "माफीवीरांचे सरकार आल्यावर एकामागे एक माफी मागण्याचे सत्र सुरू झालेय.रामदास कदम यांच्या माफीनंतर आता तानाजी सावंतांना माफी मागण्याची वेळ आली.पुढील काळात एकनाथ शिंदेंना मविआ सरकार पाडून महाराष्ट्राशी गद्दारी केल्याची देखील माफी मागावी लागेल." अस म्हणत वरपे यांनी टीका केली आहे.
काँग्रेसची प्रतिक्रिया
शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे विधान आक्षेपार्ह व बेजबाबदार आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा तसेच या बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.