बारसू रिफायनरी प्रकल्पाला होणारा स्थानिकांचा विरोध अधिक तीव्र होताना दिसत आहे. पोलिसांनी आक्रमक झालेल्या आंदोलकांवर अश्रूधुराचा वापरही केला आहे. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी असं काहीही झालं नसल्याचा दावा केला आहे. तसंच त्यांनी फोनवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा केली आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधातलं आंदोलन आणखी चिघळताना दिसत आहे. आंदोलकांना पोलिसांनी मारहाण केल्याचे, अश्रूधुराचा वापर केल्याचे गंभीर आरोपही होत आहेत. अशा परिस्थितीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सामोपचाराने परिस्थिती हाताळण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा केली आहे.
मुख्यमंत्र्यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून सगळ्या परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसंच सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
बारसू रिफायनरीच्या प्रकल्पाला स्थानिकांकडून सध्या जोरदार विरोध होताना दिसत आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे माती सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. याला विरोध करत स्थानिकांनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराचा वापर करावा लागला आहे. आपले मोबाईलही हिसकावून घेतले असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.