राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. दोघे मंत्री बंजारा समाजाच्या कार्यक्रमात (banjara Samaj kumbh Melava in Jalgaon) सहभागी होण्यासाठी जळगावला जाणार होते.
मात्र विमानात तात्रिक बिघाड अढळल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित राहाणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील जांबनेर तालुक्यात बंजारा समाजाचा महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला निघालेले असताना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या विमानात तांत्रिक बिधाड झाल्याचे लक्षात आले.
हा बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो न झाल्याने त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. आता हे दोन्ही नेते व्हिडीओ कॉन्फरन्सीगच्या मदतीने या मेळाव्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि संजय राठोड हे विमानातून इगतपूरी पर्यंत गेले होते. तेथे विमानातलं एअर प्रेशर योग्य नसल्याने त्यांना परत मुंबई विमानतळावर परत यावं लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शासकिय निवसस्थानी परत गेले.
या बंजारा समाजाच्या मेळाव्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडीओ कॉन्फरंसींच्या मदतीने या मेळव्यात सहभागी होतील.
योगी करणार संबोधित...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. येथे ते जळगावातील कुंभ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 25 जानेवारीपासून सुरू झालेला बंजारा समाजाचा मेळावा आज संपणार आहे. समारोप समारंभात युपीचे मुख्यमंत्री योगी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील बंजारा समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.