CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar rejected Sharad Pawar meal invitation Maharashtra Politics  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं शरद पवारांचं जेवणाचं निमंत्रण; दिलं 'हे' कारण

Maharashtra Politics : बारामती येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोहित कणसे

Maharashtra Politics Latest News : शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामती दौऱ्यावेळी जेवणाचे निमंत्रण दिले होते.

दरम्यान शरद पवार यांनी दिलेलं हे निमंत्रण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्या नी नाकारलं आहे. आपण पूर्वनियोजीत कार्यक्रमांमुळे उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री भोजनाचे निमंत्रण नाकारलं आहे.

उद्या बारामतीमध्ये होते असलेल्या नमो महारोजगार मेळाव्याते आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार असलेल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामती येथील 'गोविंदबाग' या शरद पवारांच्या निवसस्थानी जेवणाचे निमंत्रण देण्यात आले होत. यासंबंधी पत्र देखील २८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण नाकारलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना तसं पत्रही पाठवलं आहे. नियोजित कार्यक्रमामुळे आपल्याकडे येता येणार नाही, वेळ येईल तेव्हा तुमच्याकडे जेवणाचा आनंद घेईल असं मुख्यमंत्र्यांनी कळवलं आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

आपण शनिवार 2 मार्च रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. सदर शासकीय कार्यक्रमांप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल.तसेच उक्त दिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो. करीता विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रीत करतो.

आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील 'गोविंदबाग' ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचा देखील आपण स्विकार करावा, असे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT