मुंबई : गेल्या वीस महिन्यांपासून जर्मनीतील फास्टर होममध्ये अडकलेल्या अरिहा शहा या चिमुकलीच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी या चिमुकलीला भारतात परत आणण्यासाठी विनंती केली आहे.
या चिमुकलीच्या आई-वडिलांनी यापूर्वी जर्मन सरकारशी संपर्क केला पण अद्याप यावर तोडगा निघू शकलेला नाही. (CM Eknath Shinde letter to Ministry of External Affairs for release of baby Ariha Shah)
मुख्यमंत्र्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तुमच्या मंत्रालयानं गंभीररित्या पावलं उचलली. (Latest Marathi News)
त्याचप्रमाणं गेल्या वीस महिन्यांपासून जर्मनीतील फास्टर होममध्ये अडकलेल्या बेबी अरिहा शहाच्या प्रकरणाकडं मी तुमचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो. तिचे आई-वडील धारा आणि भावेश शाह हे मुंबईचे रहिवासी आहेत.
आपल्या बाळाला भारतात परत आणण्यासाठी त्यांचा अथक लढा सुरु आहे. गेल्या आठवड्यात या चिंताग्रस्त पालकांनी परराष्ट्र मंत्रालयाकडं त्यांच्या केसचा पाठपुरावा करण्यासाठी माझी भेट घेतली होती. तुम्ही या प्रकरणात आधीच हस्तक्षेप केला आहे, परंतु मी तुम्हाला हे प्रकरण पुन्हा जर्मन सरकारकडे मांडण्याची विनंती करतो. भारतीय बाळांच्या अशा अनेक प्रकरणांबद्दलही मला त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे. (Latest Maharashtra News)
वैयक्तिक भेटीचं आवाहन
त्यामुळं मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की, अरिहाच्या आई-वडिलांना आपली समस्या नेमकेपणानं मांडता यावी तसेच या प्रकरणाचा तपशील समजून घेण्यासाठी त्यांना वैयक्तिक भेटीसाठी वेळ द्यावी. मला आशा आहे की आपण या प्रकरणात हस्तक्षेप केल्यास बाळाच्या पालकांना न्याय मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.