Eknath Shinde Vijay Wadettiwar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: "विजयराव तुम्ही काल नव्हते..." मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षनेत्यांना चिमटा, विधानसभेत टोलेबाजी

आशुतोष मसगौंडे

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजच्या दिवसाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील टोलेबाजीने गाजली. दरम्यान आज अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांना चांगलाच चिमटा काढला आणि कायमचे विरोधीपक्ष नेते रहा असे म्हटले. शिंदे यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

दरम्यान आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'मुख्यमंत्री देवदर्शन योजने'ची माहिती देत होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर काहीतरी म्हणाले त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुमासदार शैलीत उत्तर दिले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,"अनेक जेष्ठ नागरीकांना देवदर्शनाची इच्छा असते मात्र अर्थिक परिस्थितीमुळे त्यांना परवडत नाही. अशासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची मागणी होती. त्यामुळे आम्ही ती, मुख्यमंत्री देवदर्शन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे."

हे बोलत असतानाच विजय वडेट्टिवार यांच्याकडे पाहत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,"विजयराव तुम्ही काल नव्हते, तुम्ही विरोधी पक्षाचं काम चांगले करताय त्यामुळे कायम विरोधी पक्षनेतेच रहा."

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले.

यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Latest Marathi News Live Updates : राहुल गांधी कौल्हापूरमध्ये दाखल

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

SCROLL FOR NEXT