राज्यात सध्या पावसाचा हाहाकार माजला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची मुसळधार सुरूच आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रस्ते, दळणवळण आणि संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत राज्याची यंत्रणा अलर्ट आहे, सज्ज आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेला दिलासा दिला आहे. (Eknath Shinde Rain Update in Maharashtra)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातली यंत्रणा सज्ज आहे, असं सांगत त्यांनी जनतेला दिलासाही दिला. माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, "मी सकाळपासून राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तसंच रात्री उशिरा मुख्यसचिव शिवकुमार श्रीवास्तव यांच्याशी मी चर्चा केली आहे. राज्यातली सर्व यंत्रणा अलर्ट आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये हाच आमचा प्रयत्न आहे. पण काही दुर्घटना घडल्यास यंत्रणा तात्काळ त्या ठिकाणी पोहोचू शकेल.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनीही राज्यातल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं,"मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे कऱण्याचे तसंच आवश्यक तिथे योग्य ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच राज्यातल्या स्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सेवा सुविधा पुरवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.