मुंबई : राज्यात सध्या मोठ्या राजकीय उलथापालथ घडत आहेत. गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जवळपास ५० आमदारांच्या सह शिवसेनेतून यशस्वी बंड केलं. भाजपच्या साथीने त्यांनी महाराष्ट्रात आपलं सरकार स्थापन केलं आहे. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यात आली आहे. यानंतर आज झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे-फडणवीस यांनी बहुमत सिद्ध केलं. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणात बंडामागील त्यांची भूमिका मांडत अलताना छगन भुजबळ यांच्यामुळे ४० दिवस जेलमध्ये राहावे लागल्याचा तो किस्सा सांगितला.
एकनाथ शिंदें यांनी विधान परिषदेच्या निवडणूकीनंतर जे बंड केलं त्याबद्दल बोलताना सांगितले की, विधानपरिषद निवडणूकीत दोन उमेदवार निवडून आले पाहिजेत असे आमदारांना सांगितलं. जाताना जर उमेदवार पडला तर गद्दारी केली असे म्हणतील, तेव्हा साहेबांनी फोन केला, आपले आमदार पुढे जातायत तुम्ही कुठं आहेत, तेव्हा ते पुढं चाललेत पण मी कुठं चाललोय ते मला माहिती नव्हतं, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
एकनाथ शिंदे म्हणाले की, काही प्लॅनिंग नाही केलं, मी बोलत-बोलत गेलो. यावर विधानसभेतील आमदारांनी एकच आवाज केला, त्यानंतर शिंदें म्हणाले की, अरे त्यामध्ये लपवायचं काय आहे, तुमच्याकडे टॉवर लोकेशन आहे, त्यामुळे माहिती पडलं. लगेच नाकाबंदी केली आयजीला सांगितलं नाकाबंदी करा. अरे पण मी पण कितीतरी वर्ष काम केलंय ना, मला पण नाकाबंदीतून कसं निघायचं असतं ते माहिती आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. यानंतर त्यावेळी पुढे काय झालं असं आमदारांना विचारलं असता, ते मात्र खासगीत सांगेन नाहीतर तुम्ही देखील तसंच कराल, असे एकनाश शिंदे म्हणाले. यावर सभागृहात एकच हशा पिकला.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, भुजबळसाहेब जेव्हा बेळगावला गेले होते तेव्हा वेश बदलून गेले होते. तिकडं गेल्यावर त्यांच्या लोकांनी तिकडच्या कर्नाटकच्या पोलीसांना मारलं. त्यानंतर आमची १०० लोकांची तुकडी गेली, त्यानंतर पोलीस बाकी लोकांना बसमधून जंगलात सोडत होते. शिवसेनेचे लोक आहेत कळताच त्यांनी मार-मार मारलं, डायरेक्ट बेल्लारी जेलमध्ये टाकलं. शंभर लोकांना ४० दिवस छगन भुजबळांमुळे जेलमध्ये टाकलं, असं एकनाथ शिंदेनी सांगितलं
भुजबळांना आधी जामीन मिळाला. पण आम्ही आतमध्ये होतो तिथं सांगितलं भुजबळ जे आहेत त्यांनी इथं खूप मारामारी केलीय, त्यामुळे झालं असं की आम्ही जेलमध्ये होतो त्या ठिकाणी त्यांना रविवारी अंडी आणि नॉनव्हेज मिळत असे, ते त्यांनी बंद केलं. ४० दिवस आमचे हाल झाले, पण आम्ही डगमगलो नाही, आम्ही आमचं काम केलं. तेव्हा दिघे साहेबांनी एक-एक लाखांचा जामीन केला. तेव्हा शंभर लोकांना एक कोटी लागले होते, असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. हे जे झालं यामागे हिंदुत्वाचा विचार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.