Eknath Shinde news esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : 'समृद्धी'साठी शेतकऱ्यांनी जमीन द्यावी म्हणून शिंदेंनी राबवला 'हा' फंडा; दिलं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः समृद्धी महामार्ग हा देणारा प्रकल्प आहे. या महामार्गाने सर्वांना भरभरुन दिलंय. या प्रकल्पात अनेकांनी अडचणी आणल्या मात्र त्या पार करुन आज एक मोठा प्रकल्प उभा राहिला, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

मुंबईत आयोजित 'सकाळ' सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार स्थापनेतील घडामोडी ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या कामकाजाचा आढावा मांडला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या प्रकल्पाबाबत लोकांना समजावलं. तुमची जमीन 'समृद्धी'ला दिली तर दुसरीकडे जमीनही घेऊ शकता, घरही बांधू शकता आणि छोटा-मोठा व्यवसायही करु शकता, असं पटवून दिलं. हा फक्त हायवे नाही. हा एक गेंम चेंजर प्रकल्प आहे. राज्याची अर्थव्यवस्था बदणारा ७०१ किलोमीटरचा महामार्ग आहे. असं ते म्हणाले.

अनेकांनी विरोध केला- शिंदे

देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या संकल्पनेतून समृद्धी महामार्गाची मांडणी झाली. त्यावेळी मी एमएसआरडीसीचा मंत्री होतो. त्यावेळी खात्यावर साडेसहा हजार कोटी कर्ज होतं. समृद्धीचं काम माझ्याकडे सोपवलं गेलं. त्या कामात अनेकांनी विरोध केला. मात्र मी लोकांचं समुपदेशन केलं,आरटीजीएसने तीन तासांत लोकांचे पैसे दिले. गुत्तेदाराला एक-दीड हजार शेततळे बांधायला लावले. कुठेच जोर-जबरदस्ती केली नाही. मी फिल्डवर जावून थेट गावात जावून लोकांना प्रकल्प समजून दिला.त्यामुळे भूसंपादन होऊ शकल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले की, आपण दुतर्फा ३० लाख झाडं लावत आहोत. वन्य प्राण्यांचं जीवन विस्कळीत होऊ नये म्हणून ठिकठिकाणी अंडरपास केले आहेत.महामार्गामुळे १८ तासांचं अंतर सहा ते सात तासात पार करणं शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT