मुंबई : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर महायुतीच्या आघाडीनेसुद्धा आपली बैठक घेतली असून इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीसुद्धा यावेळी चांगलीच फटकेबाजी केली आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीच्या आढावासंदर्भात महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरेंना एका पत्रकाराने "काही नेते म्हणतात की, इंडिया आघाडीकडून तुम्हाला पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित करा" असा प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले होते की, "जातो आता लगेच पंतप्रधानपदाची शपथ घेतो." त्यावर एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीत, "पंतप्रधानपदाची शपथ कशी घेणार ऑनलाईन घेणार की फेसबुकवरून घेणार?" अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीची पत्रकार परिषद सोडून निघून गेल्या अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.