CM Eknath Shinde reply NCP Sharad Pawar over Onion Price Ajit Pawar political news rak94 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : अजित पवारांसमोरच शिंदेंची कांद्यावरून शरद पवारांवर टीका; म्हणाले, तुम्ही १० वर्षे...

रोहित कणसे

राज्यात सध्या कांद्याचा प्रश्न चांगलाच पेटल्याचे पहायला मिळत आहे. कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर केंद्र सकारने दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारकडून २४१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मात्र हा दर कमी असल्याचे म्हटले होते. शरद पवारांनी केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारने प्रती क्विंटला दिलेला २४१० हा भाव कमी आहे. अशी प्रतिक्रिया देत. सरकारने चार हजार भाव द्यावा अशी मागणी देखील केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या समोरच शरद पवारांना सुनावलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पहिल्यांदा केंद्र सरकारने या प्रश्नावर हस्तक्षेप करत, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून २०१० रुपये हा भाव देऊन दोन लाख मेट्रीक टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदीचा निर्णय घेतला आहे. माझा एवढाच सवाल आहे की, आज सहकार्य करून निर्णय घेतला आहे. राज्यसरकार देखील यामध्ये मागे राहणार नाही. केवळ राजकारण न करता आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे.

पवार साहेब मोठे नेते आहेत. ते सुद्धा १० वर्ष कृषीमंत्री होते. त्या काळात देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण तेव्हा कांद्याला भाव देण्याचा निर्णय त्या संकटकाळात घेण्यात आला नाही. पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकट आलं तेव्हा ते उभे राहिले आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याचं राजकारण करण्यात येऊ नये. केंद्र सरकारने केलेल्या कामाचं स्वागत झालं पाहिजे ना की त्याचं राजकारण केलं पाहिजे.

शरद पवार काय म्हणाले होते?

केंद्र सरकारचा निर्णय अपक्षा पूर्ण करणार नाही. केंद्र सरकारने प्रती क्विंटलला दिलेला २४१० रुपये हा भाव कमी आहे. चार हजार भाव द्यावा ही मागणी आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च २४०० मध्ये निघणार नाही असे शरद पवार म्हणाले. हा कांदा टिकणार कांदा आहे. त्यामुळे शेतकरी थांबायला तयार आहे. त्यामुळे निर्यात शुल्क कमी करावे असेही शरद पवार म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Row: तिरुपती मंदिरात तूप पुरवणाऱ्या एआर डेअरीचा मालक कोण? काय करते कंपनी?

Actor Accident: 'माय नेम इज खान' फेम अभिनेत्याचा मोठा अपघात; आयसीयूमध्ये आहे परवीन डबास, प्रकृती गंभीर

Marathi New Movie : हिटलरच्या भूमिकेसाठी इतके अर्जदार ! ही आहे परेश मोकाशींच्या मुक्काम पोस्ट बोंबीलवाडीची भन्नाट कास्ट

Latest Marathi News Updates : आदित्य ठाकरे यांची पत्रकार परीषद दुपारी २:२० मिनटांनी मातोश्रीवर होणार

VBA First List: वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

SCROLL FOR NEXT