Eknath Shinde and Sanjay Raut 
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: CM शिंदेंनी पाठवली संजय राऊतांना कायदेशीर नोटीस; राऊत म्हणतात, इंटरेस्टिंग...

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. यामध्ये राऊतांना तीन दिवसांत मीडियासमोर जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ही नोटीस राऊतांनी सोशल मीडियावर शेअर करत त्याची खिल्ली उडवली आहे. हे एक मजेशीर राजकीय पत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (CM Eknath Shinde sends legal notice to Sanjay Raut)

संजय राऊत यांना मुख्यमंत्र्यांनी जी कायदेशीर नोटीस पाठवली आहे, ती सामना वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून पाठवली आहे. या नोटिशीत, २६ मे २०२४ रोजी सामनामध्ये बदनामीकारण लेख लिहिल्याचा संदर्भ देण्यात आला आहे.

वकिलांमार्फत पाठवण्यात आलेल्या या नोटिशीत म्हटलं....

माझे क्लायंट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना या राजकीय पक्षाचे गटनेते देखील आहेत, ते एक आदरणीय सार्वजनिक व्यक्तिमत्त्व आहेत. जनतेनं त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवला आहे. माझे आशील 24/7 सक्रियपणे सामाजिक आणि राजकीय कार्यात गुंतलेले असतात, त्यामुळं त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळं इतर राजकीय पक्षांना तसेच तुम्हाला त्याची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळं माझ्या आशिलाची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठी तुमच्याकडून खोटा प्रचार केला जात आहे.

माझा आशिलांच्या आरोपांनुसार, तुम्ही संबंधित वृत्तपत्राचे मुख्य संपादक असताना त्यात पूर्णपणे खोट्या आणि बदनामीकारक बातम्या प्रकाशित केल्या आहेत. २५ मे २०२४ रोजी तुम्ही लिहिलेल्या लेखात काल्पनिक आणि निंदनीय विधानं प्रसिद्ध केली आहेत. या दाव्यानुसार तुम्ही लेखात लिहिलं की, "एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात अमर्याद पैसा खर्च केला असून प्रत्येक मतदारसंघात अंदाजे 25 ते 30 कोटी रुपयांचं वाटप केलं आहे" त्याचबरोबर "अजित पवारांचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून एकनाथ शिंदेंनी हे केलं आहे," असंही यात छापून आलं आहे.

तुमचे हे आरोप माझ्या आशिलांनी फेटाळून लावले असून ही विधानं केवळ खोटीच नव्हेत तर निंदनीय आहेत. याद्वारे जनतेची दिशाभूल करुन त्यांच्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय तुम्ही तुमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव, प्रसिद्धी आणि राजकीय वजन वापरुन ही बदनामीकारक बातमी प्रकाशित करण्यात आली आहे, असंही संजय राऊतांना आलेल्या कायदेशीर नोटीशीत म्हटलं आहे.

तीन दिवसांत मीडियासमोर माफी मागा

तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुमच्या राजकीय स्वार्थासाठी माझ्या आशिलांची बदनामी करण्याची परवानगी नाही. ही नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत तुम्ही मीडियासमोर बिनशर्त माफी मागावी अन्यथा तुमच्या आणि तुमच्या बातम्यांविरुद्ध फौजदारी आणि दिवाणी कारवाई केली जाईल. तुमच्या वर्तमानपत्रावरही यानिमित्त अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असंही या नोटिशीत म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT