Shrikant Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत का बसलो? श्रीकांत शिंदे म्हणाले, "कुठे बसायचं कुठे नाही हे..."

मुख्यमंत्री १८-२० तास काम करतात, वेळ मिळेल तिथून काम करतात, असंही श्रीकांत शिंदेंनी सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीत श्रीकांत शिंदे त्यांच्या खुर्चीवर बसले असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसने एक फोटो शेअर केला होता. यामध्ये श्रीकांत शिंदेंच्या पाठीमागे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री असा बोर्डही होता. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपर सीएम म्हणत टीका करण्यात आली आहे. यालाच आता श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हा फोटो व्हायरल झाला आणि त्यावरुन वाद निर्माण व्हायला सुरुवात झाली. या वादानंतर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हे आपल्या घरातलं कार्यालय आहे, असं स्पष्टीकरण देताना श्रीकांत शिंदे म्हणाले, "हे सगळं हास्यास्पद आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत.१८ - २० तास काम करतात, कोणालाही त्यांचा कारभार सांभाळण्याची गरज नाही. फोटोमधलं कार्यालय घरातलं आहे. मी आणि शिंदे साहेब दोघेही याचा वापर करतो.

श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, "साहेब मुख्यमंत्री व्हायच्या आधीपासून आम्ही हे कार्यालय वापरतो. तिथे अनेक लोक येतात. आम्ही शासकीय घरात, किंवा कार्यालयात बसलेलो नाही. हे केवळ आम्हाला बदनाम करायचं काम आहे. हे आमचं ठाण्यातलं घर आहे, आम्ही वर्षानुवर्षे इथे बसतो, लोकांच्या गाठीभेटी घेतो. हा बोर्ड इथं तात्पुरता ठेवला आहे. शिंदे साहेबांची आज एक व्हीसी होती. त्याची तयारी म्हणून हा बोर्ड इथं ठेवलेला. फोटो काढणाऱ्याने बरोबर तो अँगल पकडून फोटो काढला. आधीसारखा अनुभव आता नाही, आता मुख्यमंत्री फिरतीवर असतात. जिथे वेळ मिळेल तिथून ते काम करत असतात. म्हणूनच आजच्या कार्यक्रमासाठी घरात ही व्यवस्था करण्यात आली होती. यातून वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. या गोष्टी अनावधानाने झाल्या असतील. मी दोन टर्मचा खासदार आहे. कुठे बसायचं आणि कुठे नाही हे मला कळतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! ऋषभ पंतवर तब्बल २७ कोटींची बोली

Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

Shreyas Iyer IPL Mega Auction 2025 : श्रेयस अय्यर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, PBKS ने मोजली तगडी रक्कम

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचा निकाल अनपेक्षित, कारण वास्तविकता वेगळी होती- जितेंद्र आव्हाड

Jalgaon Jamod Assemly Election 2024 Result : जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांचा मुंबईत सत्कार

SCROLL FOR NEXT