Eknath Shinde Love story sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde Love story : "अशी पत्नी लाभणं हे माझं नशीब" एकनाथ शिंदेंची लग्नानंतरची लव्हस्टोरी

आज आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लग्नानंतरच्या प्रेमाची गोष्ट सांगणार आहोत.

निकिता जंगले

Eknath Shinde Love story : सध्या देशात वेलेंटाईन वीक सुरू आहे. प्रेमाचे दिवस आहे. त्यामुळे अनेक लव्हस्टोरींविषयी बोलले जाते. लग्नाआधीचं प्रेम आणि लग्नानंतरचं प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे आज आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लग्नानंतरच्या प्रेमाची गोष्ट सांगणार आहोत.

वेलेंटाईन वीक सुरू असतानाच आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी लता शिंदे यांच्या अनोख्या प्रेमाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (CM Eknath Shinde spouse wife Lata Shinde love story life story)

एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांच मुळात अरेंज मॅरेज आहे. एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास हा खू खडतर होता मात्र या कठिण प्रवासात लताजी त्यांच्या नेहमी खंबीरपणे सोबत राहल्या. अनेकदा पत्नीचं कौतुक करताना शिंदे म्हणाले, "लतासारखी पत्नी लाभणे हे माझं नशीब आहे"

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८०च्या दशकात त्यांनी शिवसेनेत प्रवास केला पण फार कमी लोकांना माहिती आहे की एकनाथ शिंदे एक रिक्षाचालक होते आणि त्याआधी ते एका कंपनीतही काम करायचे. या संघर्षमय काळातही लता या नेहमीच शिंदेच्या सोबत राहल्या

एकनाथ शिंदेच्या आयुष्यात आलं वादळ

२००० हे वर्ष शिंदे कुटूंबासाठी काळं वर्ष होतं. कारण त्या वर्षी २ जुन ला एकनाथ शिंदेंनी त्यांची दोन अपत्ये गमावली आणि त्याचं आयुष्यच बदललं आजही या संदर्भात बोलताना ते भावूक होतात. बोटींग दरम्यान त्यांचा मुलगा दीपेश वय ११ आणि आणि शुभदा वय ७ यांचा अपघातात मृत्यू झाला.

त्यावेळी सर्व संपलं आणि आता राजकारण सोडावं, असं त्यांना वाटलं पण आनंद दिघेंनी त्यांना धीर दिला आणि समजावून सांगितले. या कठिण काळातून जाताना लताजी एकनाथ शिंदे यांच्या सोबत पदोपदी खंबीरपणे उभ्या राहल्या.

सुरवातीचं संघर्षमय आयुष्य असो की कठिण काळ किंवा राजनितिक चढउतार त्या नेहमी एकनाथ शिंदेंसोबत होत्या.सामाजिक, राजकीय जीवनात एकनाथ शिंदे मग्न असताना त्यांच्या संसाराचा गाडा लताजींनी जबाबदारीने व अतिशय मायेने हाकला त्यामुळे शिंदे म्हणतात की लताजी सारखी सुजाण,सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे त्यांचे बलवत्तर नशीब आहे.

लताजी या बांधकाम व्यवसायात सक्रिय असून बिझिनेस वूमन आहे.कठिण काळात फक्त एकनाथ शिंदे यांना धीर दिला नाही तर या काळात त्या सुद्धा कधी खचल्या नाहीत, त्यांनी कधीही हार मानली नाही. त्या पुन्हा नव्याने उभ्या झाल्या आणि आपलं कुटुंब सांभाळलं.

का रिक्षावालापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंतच्या एकनाथ शिंदेंच्या या खडतर आणि आव्हानात्मक प्रवासात लताजी नेहमी सोबत होत्या.यालाच खरं प्रेम म्हणावं. प्रेमाची व्याख्या ही वयानुसार आणि आयुष्यातल्या प्रत्येज टप्प्यावर बदलत जाते. एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांच्या संघर्षमय आयुष्यात हे प्रेम निरंतर दिसून आलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT