Eknath Shinde Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde News: 'अजितदादांची चिंता करू नका, या एकनाथ शिंदेच्या मागं 220 आमदारांचं पाठबळ आहे'

Ajit Pawar Latest Update: पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आता घरात बसणारा नाही, तर रस्त्यावर उतरून काम करणारा मुख्यमंत्री तुमच्यासोबत आहे.

सकाळ डिजिटल टीम

'यापूर्वी आमदारांचे खच्चीकरण होत होते. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत होते. आता अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्याची तुम्ही काही चिंता करू नका.'

Kolhapur News : पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आता घरात बसणारा नाही, तर रस्त्यावर उतरून काम करणारा मुख्यमंत्री तुमच्यासोबत आहे. त्यामुळे तुम्ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बनून काम करा. पक्ष, संघटन मजबूत करा. सर्वसामान्यांचे सरकार आहे हे तळागाळापर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.

येथील शिवाजी पेठेतील पेटाळा मैदानावरील मेळाव्यात ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने आणि श्रीकांत शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar), आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. संपूर्ण मंडपात पावसाने चिखल झाला असला तरीही शिवसैनिकांचा उत्साह कायम होता.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की ''अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी आहे. आता कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारे सरकार आहे. आमची भावनिक आणि वैचारिक युती आहे. डबल इंजिन सरकारचे काम पाहून विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकली. ही युती स्वार्थासाठी, खुर्चीसाठी केलेली नाही.

त्यामुळे अनेकजण आपल्या सरकारमध्ये येत आहेत. तुम्ही चिंता करू नका, आता या एकनाथ शिंदेच्या मागे २२० आमदारांचे पाठबळ आहे. पूर्वी शिवसैनिकांवर मोका लावायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे आता तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हा मुख्यमंत्री तुमच्यासाठी मंत्रालयात बसला आहे. तुम्ही एकनाथ शिंदे बनून सरकारचे सर्वसामान्यांसाठी घेतलेले निर्णय घराघरांत पोहोचवा.

हे सरकार माझं आहे, कार्यकर्ता माझा आहे, असा विश्‍वास लोकांमध्ये निर्माण करा. सत्ता येते-जाते. त्यामुळे असे काम करा की, सत्ता नसतानाही लोकांनी आपल्याकडे तोंड फिरवून जाता कामा नये. तेव्हाही लोकांनी आपली विचारपूस केली पाहिजे.''

गेल्या वर्षभरात एकही निर्णय वैयक्तिक फायद्याचा घेतला नाही. सर्व निर्णय लोकहिताचे, सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतले. महिलांना एसटी बसमध्ये सवलत दिली. आरोग्याच्या सुविधा दिल्या. यापूर्वी रखडलेल्या योजना, प्रकल्प पुन्हा सुरू झाले. कामाला वेग आला. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठांसाठीही सरकार निर्णय घेत आहे. बजेटला पंचामृत नाव दिले. त्यावर विरोधकांनी हे पूर्ण करणार कसे, अशी टीका केली.

मात्र, या सरकारला केंद्र शासनाकडून मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे हे निर्णय होत आहेत. सरकार दिवसेंदिवस अधिक भक्कम होत आहे. महिलांनाही सक्षमीकरणासाठी लवकरच नवे धोरण आणले जाईल. बचत गटांच्या उत्पादनांना मार्केट उपलब्ध करून दिले जाईल. खेटे मारणे, फेऱ्या मारणे, ‘सरकारी काम सहा महिने थांब’ हे आपल्याला बंद करायचे आहे.

यापूर्वी आमदारांचे खच्चीकरण होत होते. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत होते. आता अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्याची तुम्ही काही चिंता करू नका. काही राजकीय बेरजेची गणिते असतात, तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. शेतकरी, महिला, मुलांसाठी, मुख्यमंत्री निधीसह इतर केलेल्या मदतीचीही माहिती त्यांनी दिली.

मेळाव्याचे संयोजक राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बोलताना पूरस्थिती कोल्हापूरला शिंदे यांनी ठाण्यातून मदत केली. इतर राज्यात सुद्धा त्यांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे ते संकटमोचन आहेत. मुख्यमंत्र्यांचे हे गुण घेऊन आपण पुढे कार्यरत राहिलो, तर राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होता येईल असे सांगितले.

महाविकास आघाडीतील उमेदवाराला पोटनिवडणुकीत मदत करून विजयी केले. त्या यशाचे मानकरी जे शिवसेनेचे नव्हते, ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही, प्रचार केला नाही, त्यांना बक्षीस म्हणून राज्यसभेची उमेदवारी दिल्याचीही खंत क्षीरसागर यांनी बोलून दाखविली.

यावेळी सांगलीचे आनंदराव पवार, शिवाजीराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेने उपनेते आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, रवींद्र चव्हाण, शिवाजीराव जाधव, राहुल चव्हाण, ऋतुराज क्षीरसागर, नंदकुमार वळंजू, मंगल साळोखे, पूजा भोर, सुचित्रा मोरे, अर्जुन आबिटकर, किशोर घाटगे यांच्यासह शिवसेनेचे सांगली, सातारा आणि कोल्हापूरचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी प्रास्ताविकात क्षीरसागर यांना विधान परिषदेच्या बारा आमदारांमध्ये स्थान द्यावे, अशी मागणी केली. अंकुश निपाणीकर यांनी स्वागत केले. समर्थ कशाळकर यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.

तसेच खासदार संजय मंडलिक यांचा लोकसभेत झालेल्या गौरवाबद्दलही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि क्रिडाई-कोल्हापूरकडूनही निवेदने दिली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महादेव सावंत (मिरज), मनसेचे सुनील निरंकारी (गांधीनगर), ठाकरे शिवसेनेचे एसटी सेनेचे जितेंद्र इंगवले यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

सर्किट करून निधी देऊ

कोल्हापूरच्या मुख्य रस्त्यांसाठी शंभर कोटी दिले आहेत. आता अंतर्गत रस्त्यांसाठीही निधी दिला जाईल. कन्व्हेशियल सेंटरसाठीही शंभर कोटी दिले आहेत. आताही पंचगंगा प्रदूषणमुक्ती, तीर्थक्षेत्र आराखडा, हेरिटेज स्ट्रीट, रंकाळा, फुटबॉल अशा सर्वांसाठी निधीचे सर्किट तयार केले जाईल. कोल्हापूर ऐतिहासिक शहर आहे, ही ओळख पुसू देणार नाही, असाही विश्‍वास मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखविला. सर्किट बेंचचा ही प्रश्‍न मार्गी लावू, इचलकरंजीमध्ये जाणाऱ्या रेल्वेमार्गासाठीही निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते अतूट

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते होते. राजकीय कार्याची सुरुवात ते करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन करीत होते. त्यांच्‍या सभांना तुम्ही मोठी गर्दी करीत होता. आजपर्यंत हे नाते तुम्ही अतूट ठेवण्याचे काम केले आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगताच शिवसैनिकांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला.

माझ्या सहीने जीव वाचणार म्हणून...

मंत्रालयात, निवासस्थानी, गाडीमध्ये, कार्यक्रमात असलो तरीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पत्रावर मी सही करतो. कारण, माझ्या एका सहीने एखाद्याचा जीव वाचणार असतो. येथे आताही काही सह्या केल्या आहेत. गेल्यावर्षभरात सुमारे ८६ कोटींची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिली आहे. त्यातील कोल्हापूरला सहा कोटी दिले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यामुळेच मदत मिळालेल्या एका कोल्हापुरातील दाम्पत्याने त्यांच्या मुलीचे नाव ‘दुवाँ’ ठेवल्याचेही त्यांनी भाषणात सांगितले.

विरोधकांची बोट फुटली

काहींनी सरकारच्या विरोधात ‘वज्रमुठ’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही फसला. पंतप्रधान नरेंद्र मोंदींना विरोधासाठी पाटणा येथे जाऊन विरोधकांनी मोट बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची बोट फुटली. तेथे त्यांचा नेतृत्वाचा एक चेहराही ठरला नाही, हेच मोदी यांचे यश आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मला अहंकार नाही

जेव्हा जेव्हा अन्याय होतो, तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येतो, असे कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राजकीय आरोपाला मी थेट कामातून उत्तर देतो. मला अहंकार नाही. सत्येसाठी आणि खुर्चीसाठी मी कधीही तडजोड करणार नाही, असेही विश्‍वास मुख्यमंत्री शिंदे यांना दाखविला.

शाल श्रीफळ... नाहीतर मोठा नारळ!

मुंबईतील नालेसफाई वेळी कोण मुख्यमंत्री गेला होता काय? मी पहिला मुख्यमंत्री आहे तेथे गेलो होतो. त्यावेळी किती गाळ काढला हे मी विचारले नाही; पण जर नाले तुंबले नाहीत, तर पावसाळ्यानंतर तुमचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करणार; अन्यथा मोठा नारळ देऊन तुम्हाला घरी पाठवणार, असाही इशारा मी अधिकाऱ्यांना दिला आहे. असेही जनतेसाठी करावे लागत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सर्किट करून निधी देऊ

कोल्हापूरच्या मुख्य रस्त्यांसाठी शंभर कोटी दिले. आता अंतर्गत रस्त्यांसाठीही निधी देऊ. कन्व्हेशियल सेंटरसाठीही शंभर कोटी दिलेत. पंचगंगा प्रदूषणमुक्ती, तीर्थक्षेत्र आराखडा, हेरिटेज स्ट्रीट, रंकाळा, फुटबॉल अशा सर्वांसाठी निधीचे सर्किट तयार केले जाईल. कोल्हापूर ऐतिहासिक शहर आहे, ही ओळख पुसू देणार नाही. सर्किट बेंचचा प्रश्‍न मार्गी लावू, इचलकरंजीमध्ये जाणाऱ्या रेल्वेमार्गासाठीही निधी देऊ, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT