CM Eknath Shinde Nagpur-Goa Shaktipeeth Highway  esakal
महाराष्ट्र बातम्या

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होताच सरकारनं घेतली महत्त्वाची भूमिका; CM शिंदे म्हणाले, 'हा प्रकल्प जनतेवर थोपविणार...'

कोल्हापूरमध्ये या महामार्गाविरोधात मोर्चा काढून सरकारला इशाराही देण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पावरून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला जबरदस्त फटका बसला होता.

मुंबई : बहुचर्चित नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गाला (Nagpur-Goa Shaktipeeth Highway) राज्यभरातून विरोध होऊ लागल्याने आता राज्य सरकारनेही नमती भूमिका घेतली आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढू लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समाजमाध्यमांतून या महामार्गाबाबत विरोध होत असलेल्या ठिकाणी फेरआखणी करण्याचा सरकार विचार करत असल्याची भूमिका मांडली.

महाविकास आघाडीसह, शेतकरी संघटना आणि विविध ठिकाणांवरील शेतकऱ्यांनी (Farmers) त्याला कडाडून विरोध केला आहे. कोल्हापूरमध्ये या महामार्गाविरोधात मोर्चा काढून सरकारला इशाराही देण्यात आला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या ‘एक्स’वर नोंदविलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की,‘‘ नागपूर- गोवा जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करूनच त्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प पुढे नेला जाईल.

कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपविणार नाही अथवा रेटून नेणार नाही. समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला. त्यानुसार या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेरआखणी करता येईल का? याचाही विचार करीत आहोत. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही.’’

शक्तिपीठ महामार्गाला बहुतांश सुपीक जमिनी जाणार असल्याने शेतकऱ्यांनी त्याला विरोध दर्शविला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा विरोध अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६० गावांतून १२६ किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. या महामार्गाला महाविकास आघाडी , शेतकरी संघटना यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांनीही विरोध दर्शविताना तो रद्द करण्याची मागणी केली आहे. या महामार्गाविरोधात जिल्ह्यात प्रचंड मोर्चा काढण्यात आला.

‘शक्तिपीठ’ला मुख्यमंत्र्यांचे समर्थन निषेधार्ह : फोंडे

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गप्रश्‍नी गेले तीन महिने मूग गिळून गप बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्‍नी वक्तव्य करून हा प्रकल्प अप्रत्यक्षरित्या रेटणार असल्याचे जाहीर केले आहे. याचा निषेध असून आता एकाही मंत्र्याला जिल्ह्यात येऊ देणार नाही, असा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी आज येथे पत्रकाद्वारे दिला आहे. त्यांनी म्हटले आहे, की आम्हाला या रस्ते प्रकल्पाची फेरआखणी नको आहे. इतर कोणत्याही गावातून हा मार्ग गेला तरी त्याला आम्ही विरोध करू. या राज्यात आमदारांची विक्री होते; पण शेतकरी आपले इमान आणि आपली जमीन कधीही विकणार नाही. महायुती सरकार आपली धोरणे बदलायला तयार नसतील तर आम्हाला सरकारच बदलावे लागणार आहे, हे स्पष्ट आहे. या रस्त्याच्या नियोजनामध्येच मोठा भ्रष्टाचार झाला आहे. येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत.

लोकसभा निवडणुकीत फटका

शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पावरून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला जबरदस्त फटका बसला होता. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने सरकार सावध झाले आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटनेने मोर्चा काढून शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शविला आहे. महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही शक्तिपीठ रद्द करण्याची मागणी केली आहे. या सर्व विरोधानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाची फेरआखणी करण्याची भूमिका घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT