मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळं रखडलेल्या प्रलंबित उमेदवारांना आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आली. त्यामुळं या रखडलेल्या नियुक्तांचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या नियुक्त्या रखडल्या होत्या. (CM gave appointment letters to those who stayed appointments due to Maratha reservation)
राज्यभरात 1,064 उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. या उमेदवारांना आज विविध पदांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. या पदांमध्ये तलाठी, नायब तहसीलदार, महावितरण अशा विविध पदाच्या भरत्या रखडल्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला हा निर्णय मार्गी लावण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नियुक्त्यांबाबत निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.