राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज हजाराच्या जवळपास नवे कोरोना रूग्ण आढळत आहेच. दरम्याव या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत टास्क फोर्स (Task Force) ची बैठक बोलवण्यात आली आहे. (CM Uddav thackeray called task force meeting amid surge in corona cases in the state)
आज रात्री होणाऱ्या या आरोग्य विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत. या बैठकीत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने उपयायोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांमध्ये आणखी काही निर्देश जारी करण्याबाबत या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतले जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात काल जवळपास दीड हजारांच्या जवळ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet Meeting ) बैठक सुरू झाली आहे. यामध्ये कोरोनाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणार असून, बैठकीमध्ये मास्क सक्तीबाबत (Face Mask) निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान मुंबईमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, त्या पाठोपाठ ठाण्याचा नंबर लागतो. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.