मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी आज संवाद साधला आहे. या फेसबूक लाईव्हच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊन संदर्भातही भाष्य केलं आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला आहे. गेल्या महिन्यात २८ नोव्हेबरला सरकारनं एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या काळात अनेकजण डोळे लावून बसले होते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.
गेल्या 28 नोव्हेंबरला महाविकास आघाडीने एक वर्ष पूर्ण केले. हे सरकार आज पडेल, उद्या पडेल म्हणून अनेकजण डोळे लावून बसले होते. मात्र सरकार पडलं नाही, विकास करत आणि राजकीय हल्ले परतवत या सरकारने एक वर्षे पूर्ण केलं असल्याचा टोला लगावत जोरदार हल्लाबोल केला आहे.
उलट गेल्या १०० वर्षात परिस्थिती आली नव्हती अशा परिस्थितीचा सामना करत, विकास कामे करत आणि राजकीय हल्ले परतवत आमच्या सरकारने एक वर्षे पूर्ण केलं, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
मी या खूर्चीवर बसलो आहे. मी जेव्हा जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा तुमच्या घरातील व्यक्ती असल्यासारखंच बोलतो. ते तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळे तुमच्या विश्वासाला तडा बसू देणार नाही. विकासाला विलंब लागला तरी चालेल. पण तो दीर्घकालीन असावा, तात्कालिक विकास नको. जे काही करू ते भावी पिढीसमोर ठेवूनच करू. चांगलंच करु, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला दिली आहे.
---------------------------
(संपादन- पूजा विचारे)
CM Uddhav Thackeray addressed State facebook live attack bjp
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.