Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

"मेट्रोचं श्रेय द्यायला तयार, पण..."; CM ठाकरेंचं भाजपवर टिकास्त्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गुढीपाढव्याचा दिवशी मुंबईकरांना अनोखे गिफ्ट देत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फीत कापून मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चे लोकार्पण केलं. या दरम्यान सुरु असलेल्या श्रेय घेण्यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्ष भाजपला धारेवर धरलं. त्यांनी 'निदान तुम्ही जे काम सुरु केलं होतं ते आडमुठेपणाने अडवून तर ठेवलं नाही याचं श्रेय तरी आम्हाला द्या', असा खोचक टोला त्यांनी लगवला आहे.

...तोपर्यंत आपण सर्वांनी देखील मास्क घालावा

आजचा दिवस हा माझ्यासाठी आपल्या सर्वांसाठी खरोखरीच आनंदाचा असून, निर्बंधमुक्तीचा आपला हा पहिलाचा दिवस आहे. सकाळपासून चार कार्यक्रमांचे लोकार्पण केले. त्यातील दोन ऑनलाईन आणि दोन प्रत्यक्षात. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर आणि माझ्यावरील शस्त्रक्रियेनंतर मी एवढी लोकं प्रत्यक्षात पहिल्यांदाच बघतोय. यावेळी त्यांनी आपण मास्कसक्तीकडून निघालेलो आहोत पण मास्कमुक्तीकडे गेलेलो नाही. म्हणूनच माझी आपल्याला विनंती आहे की, जो पर्यंत मी आणि उपमुख्यमंत्री मास्क घालतोय तोपर्यंत आपणपण मास्क घालाला असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले. असे ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, माझा जन्म मुंबईत झालाय, साठ वर्ष बदलती मुंबई पाहतोय. कॉलेजच्या आयुष्यात मी रेल्वेचा अनुभव घेतला आहे. गर्दी वाढत चालली आहे, किती सुविधा द्यायच्या, जसे आपण मेट्रोची सुरुवात केली आहे असे अनेक प्रकल्प पाहिलेत नारळ फुटतात पण प्रकल्पाचा पत्ता नसतो.

कोरोनानंतर एक नवी साथ आलीय..

कोरोनानंतर एक साथ आलीय, एकतर तुम्ही काही केलं नाहीत, जे काही केलं ते आम्हीच केलं, त्यातुनही नवीन काहीतरी केलं तर त्यात भ्रष्टाचार केला आहे. अशी एक नवीन साथ आली आहे. लक्षणे सगळी एकत्र होतात, असे जे काही रुग्ण आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे मुख्यंमंत्री म्हणाले. आम्ही काय करतोय तुम्ही काय करताय हे जनता बघतेय असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जून्या भाषणाची आठवण करुन देत, कौरवांचे चाळे बघू न शकणारा धृतराष्ट्र नाही, हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे, कोण काय करतंय ते हा बघतोय, असे ते म्हणाले. रातोरात झालेली झाडांची कत्तल मुंबईकरांनी पाहिली आहे आणि लक्षात देखील ठेवली आहे असेही ते म्हणाले. पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता आम्ही विकास करत आहोत, हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येऊच नये, तुम्ही आनंदाने आयुष्य जगावं यासाठी सुविधा दिल्या तर त्याला विकास म्हणातात असे त्यांनी सांगितलं.

अडलेले अनेक प्रकल्प का मार्गी नाही लावत..

मुंबईवर तुमचं प्रेम कामामध्ये दिसलं पाहिजे, मेट्रोच काय आणखी काय कामे केली असतील त्याचं श्रेय जे ओरडतायत त्यांना द्यायला मी तयार आहे, पण जसं मेट्रोवर तुमचं प्रेम दाखवण्यासाठी बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी जो आग्रह चाललेला आहे, मुंबईच्या आर्थिक केंद्राची जमीन बुलेट ट्रेनसाठी घेतलीय त्याचा काय उपयोग आहे. मुंबईवर प्रेम आहे तर कांजूरची ओसाड पडलेली जमीन का नाही देत, पंपिंग स्टेशनसाठी जागा द्या, धारावीच्या विकासाठी रेल्वेची जमीन देत नाहीत, आणि काही केलं की आम्हीच केलं. सरकार तुमचं आहे मग मुंबईसाठी या गोष्टी तुम्ही का नाही करत, अडलेले अनेक प्रकल्प का नाही मार्गी लावत असा सवाल त्यांनी केली.

या कामातं श्रेय मुंबईकरांच आहे, महाराष्ट्राची जनता देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा चा पाठकणा आहेत, हा पाठकणा ताठ ठेवण्याचा काम करतोय त्याबदल्यात आम्हाला काय मिळतंय. आम्ही कोणाकडे भिक मागत नाहीये न्यायहक्क मागतोय, आणि त्यासाठी वेळपडली तर लढल्याशिवाय राहणार नाही, ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका असे ते म्हणाले. निदान तुम्ही जे काम सुरु केलं होतं ते आडमुठेपणाने अडवून तर ठेवलं नाही याचं श्रेय तरी आम्हाला द्या असे देखील ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT