Uddhav-Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री ठाकरे सव्वा वर्षांत मंत्रालयात आलेच नाहीत...

मुख्यमंत्री ठाकरे सव्वा वर्षांत मंत्रालयात आलेच नाहीत... आदित्य ठाकरेंचीही मंत्रालयाकडे पाठच CM Uddhav Thackeray did not visit even once to Mantralay Office in last 15 months

ज्ञानेश सावंत : सकाळ वृत्तसेवा

आदित्य ठाकरेंचीही मंत्रालयाकडे पाठच

मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) ‘मातोश्री’तून (Matoshri) बाहेर पडत नसल्याची विरोधकांकडून टीका होत असतानाच, गेल्या १५ महिन्यांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदाही मंत्रालयाची पायरी चढली नसल्याचे उघड झाले आहे. कोरोना (Corona Outbreak), लोकांच्या गर्दीमुळे (Crowd) ठाकरे हे येत नसल्याचे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था, प्रशासनाने स्पष्ट केले. परिणामी, मुख्यमंत्री भेटत नसल्याचा सूर विरोधकांसह महाविकास आघाडीच्या आमदारांत आहेत. (CM Uddhav Thackeray did not visit even once to Mantralay Office in last 15 months)

मुख्यमंत्री ठाकरे हे ‘मातोश्री’, ‘वर्षा’ आणि सह्याद्री अतिथिगृहातूनच आपली कामे आटोपत असल्याचे सांगण्यात आले. लॉकडाउनमध्ये गेल्या वर्षी मार्च महिना आणि त्यानंतरचे काही दिवस अत्यावश्यक सेवा वगळता मंत्रालयातील सर्व कामे बंद होती. त्यात आपल्यामुळे सुरक्षा व्यवस्था, प्रशासन आणि राजकीय मंडळींची धावपळ होऊन, गर्दी होण्याच्या शक्यतेने मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता ‘मातोश्री’, ‘वर्षा’ आणि ‘सह्याद्री’मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या, जनतेशी संवाद ठेवला.

गेल्या वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये साथ कमी झाल्यावर मंत्रालयातील कामांना वेग आला, तरीही ठाकरे मंत्रालयात आले नाहीत. या काळात लोकांची आणि खासगी कामे घेऊन येणाऱ्या आमदारांच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दालनात चकरा वाढल्या. अशा कामांसह महत्वाच्या बैठकांसाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात येणे अपेक्षित असते. मात्र, ‘मुख्यमंत्री आज नाहीत’ असा ‘निरोप’ घेऊन आमदारांना सातव्या मजल्यावरून काढता पाय घ्यावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

मुख्यमंत्री भेटत नसल्याचे छोटे ‘पोस्टर्स’ लावून आमदार रवी राणा यांनी तर आपली नाराजी उघड केली होती. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर डिसेंबर (२०२०) या काळात कोरोना संपल्याचे सांगत सर्व व्यवहार सुरळीत झाले, तरीही ठाकरे हे मंत्रालयाकडे फिरकले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह सर्वच मंत्री आठवड्यातून किमान तीन-चार दिवस मंत्रालयातून आपले कामकाज करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे हेच येत नसल्याची चर्चा आहे.

Aaditya Thackeray

आदित्य ठाकरे यांचीही अनुपस्थिती

मंत्रालयातील सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची दालने आहेत. मुख्यमंत्र्याप्रमाणेच आदित्यही मंत्रालयात येत नसल्याचे तेथील कर्मचारी सांगतात. त्यामुळे मंत्रालयाच्या जुन्या-नव्या इमारतीतील सातवा मजला वगळता इतर मजल्यांवर मंत्री, आमदार, अधिकारी आणि लोकांची कामासाठीची धावपळ पाहायला मिळते.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT