मुंबई : एमआयएम महाविकास (MIM) आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचा प्रस्तावा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) शनिवार दिला होता. त्यानंतर खासदारांसोबत पार पडलेल्या बैठकीत हा सर्व एमआयएमचा कट असून, तो उधळून लाववण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. या सोबतच हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवण्याचादेखील सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडीत एमआयएमच्या युतीबाबतच्या प्रस्तावानंतर विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, त्यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाष्य करत हा कट असून तो उधळून लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. विरोधक विरोध करत राहणार पण तितक्याच ताकदीने आता आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे असेही ठाकरे यावेळी सांगितले. (CM Udhav Thakare Reaction On MIM Alliance )
महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi) युतीच्या प्रस्तावावर तिनही पक्षांकडून नाकारण्यात आले होते. त्यानंतर या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, एमआयएमचा हा कट असून तो उधळून लावण्याबरोबरच हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवा, एमआयएमचा कट अधळून लावण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांना दिले आहेत.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासंदर्भात (Shivsampark Abhiyan) खासदार, संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांशी सेनाभवन येथे ऑनलाईन संपर्क साधला त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी खासदारांना वरील सूचना केल्या आहेत. यावेळी ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मात्र, त्यातील प्रमुख मुद्दा एमआयएमने दिलेल्या प्रस्तावावर बोलताना ठाकरे यांनी एमआयएमचा कट उधळून लावण्याबरोबरच हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवण्याच्या सूचना शिवसेनेच्या खासदारांना दिल्या आहेत. तसेच सध्या शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे सांगत विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे असेदेखील ठाकरे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.