CM Thackeray_pediatricians Photo by ANI
महाराष्ट्र बातम्या

राज्यात २४ तास लसीकरण मोहिम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

जून महिन्यापासून लसींचं उत्पादन वाढेल अशी आशा

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत असली तरी रोजची रुग्णवाढीची आकडेवारी देशात सर्वाधिक आहे. हा संसर्गाचा वेग रोखण्यासाठी १८ वर्षांच्या पुढील सर्वांना लसीकरण करणं गरजेचं आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात २४ तास लसीकरण मोहिम राबवण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. रविवारी बालरोगतज्ज्ञांसोबत (paediatricians) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (CM Uddhav Thackeray indicates 24 hour vaccination campaign in the state)

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी वर्तवली आहे, तसेच या लाटेसाठी कारणीभूत असलेला व्हेरियंट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जातंय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बालरोगतज्ज्ञांसोबत रविवारी ऑनलाईन बैठक बोलावली होती. यावेळी सर्व डॉक्टरमंडळी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

मुख्यमंत्री म्हणाले, "कोरोना प्रतिबंधक लसींचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने सध्या राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. मला आशा आहे की, जून महिन्यापासून लसींची उत्पादन क्षमता वाढेल. त्यानंतर आपण राज्यात २४ तास लसीकरण मोहिम राबवू शकतो"

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट जवळपास आटोक्यात आली आहे. पण तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तिसरी लाट येणार असून लहान मुलांना त्याचा आधिक धोका आहे. तज्ज्ञांच्या या सल्ल्यानंतर देशभर तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरु झाली आहे. महाराष्ट्र सरकारही यामध्ये मागे नाही. लहान मुलांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. याच टास्कफोर्ससह राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला. विरोधकांकडून होणारी सतत टीकेची झोड आणि एकंदर कोरोना परिस्थितीची आपल्याला जाणिव असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपली बाजू स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT